नाशिक – टाटा स्टील कंपनीने त्यांचे जे कर्मचारी कोरोनामुळे मृत्युमुखी पडले अशा कर्मचाऱ्याच्या कुटुंबांना कर्मचाऱ्याच्या साठ वर्षे वयापर्यंत पूर्ण वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.टाटा स्टील कंपनी चा हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून सिटू सह सर्व कामगार संघटना टाटा स्टील कंपनीचे अभिनंदन करीत आहेत.
देशातील बडे उद्योग व कार्पोरेट कंपन्यांनीही अशाच प्रकारचा निर्णय करावा असे आवाहन सिटू कामगार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॅा. डी. एल.कराड यांनी केले आहे.
तु पुढे म्हणाले की, छोटे व मध्यम उद्योगांमध्येही मोठ्या प्रमाणावर कामगार कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. या कामगार कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना अशाच पद्धतीने साठ वर्षे वयापर्यंत वेतन मिळण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार व कंपनीने संयुक्तपणे योगदान करावे.