इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
Wego Library Foundation ने प्रकाशित केलेल्या “Top 16 Secrets of Wealth Creation by Patents” या पुस्तकाचे प्रकाशन लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे यांच्या शुभ हस्ते झाले. या कार्यक्रमाचे आयोजन अशोका बिजनेस स्कूल, नाशिक येथे करण्यात आले होते.
पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात Wego Library Foundation चे संस्थापक डॉ. निलेश पावसकर यांनी पुस्तका बद्दल माहिती देताना फौंडेशन च्या कार्याची सखोल माहिती दिली. अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे सचिव श्रीकांत शुक्ल यांनी सांगितले की, नजीकच्या काळात या विषयाची निकड ओळखून विद्यार्थ्यांना पेटंट्स आणि संपत्ती निर्मितीचे महत्त्व शिकवले जाणे गरजेचे आहे. यासाठी संस्था ठोस पाऊले उचलत आहे. लवकरच, अशोका एज्युकेशन फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांना इयत्ता ७ वी पासूनच पेटंट्स आणि संपत्ती निर्माण विषयावर पाठ्यक्रम दिला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे यांनी पेटंट्सच्या महत्वावर भर दिला. ते म्हणाले, “Foundation ने सुरु केलेली ही चळवळ अत्यंत स्तुत्य असून GDP वाढवायचं असेल तर पेटंट्स वाढवली पाहिजेत. सामान्य लोकांना पेटंट्सची ओळख असणे आवश्यक आहे. Wego Library Foundation च्या कार्यामुळे या क्षेत्रात नवा उत्साह निर्माण होईल. म्हणूनच या फ़ाउंडेशनचे कार्य आशादायक, आणि कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या प्रसंगी त्यांनी पुस्तकाच्या सर्व लेखकांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला उद्योजक श्रीकांत जोशी, डॉ. उदय वाड, डॉ रावसाहेब घेगड़े, महेंद्र पांगरकर, संजय खानजोड़े, मिलिंद तारे, ओमप्रकाश रावत, निनाद कुलकर्णी,पराग खेड़कर , डॉ. एस. जी. मोरे, स्मिता शिंदे आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन Wego Foundation चे प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. डी. एम. गुजराथी यांनी केले.