साप्ताहिक राशिभविष्य – २३ ते ३० ऑक्टोबर
मेष – नवीन व्यावसायिक संकल्प करण्याचा सप्ताह. यावेळी नियमित गोष्टी सोबत ठेवूनच त्याला जोडून नवीन संकल्प करावा. त्यात जरूर यश मिळेल…..
वृषभ – आपणास त्रासदायक ठरलेली परिचित मंडळी अथवा अन्य ओळखीचे घटक यातील अनेकांचे मतपरिवर्तन होईल. आपणाबद्दलचे गैरसमज दूर होतील…..
मिथुन – मागील काळात वेळोवेळी केलेल्या विविध प्रकारच्या गुंतवणुकीचा चांगला परतावा यावेळी मिळेल. त्यातून मोठ्या गुंतवणुकीचा पाया भरला जाईल…..
कर्क – नोकरदार व्यक्तींसाठी वरिष्ठ तसेच सहकारी यांच्याकडून कार्याची दखल घेतली जाईल. कार्य गौरव होईल. प्रमोशनचे चान्सेस…..
सिंह – आपण आपल्या मेहनतीने जुळवून आणलेली विविध प्रकारची प्रगतीचा फायदा करून घेण्याची संधी. आपल्याच बोलण्याने अथवा विपरीत कृतीने जाऊ नये याची काळजी घ्यावी….
कन्या – अनेक चांगल्या प्रकारची कृती आपल्या हातून होत असतात. परंतु या सप्ताहात केलेल्या कृती बोलून दाखवू नये. अन्यथा त्याचे कोणत्याही प्रकारचे श्रेय मिळणार नाही…..
तूळ – विविध प्रकारच्या प्रवासाची संधी लाभेल. निसर्गभ्रमण, ग्रुप सह,ल कौटुंबिक दौरा, परदेश गमनही होऊ शकते…..
वृश्चिक – छोट्या छोट्या गोष्टींवर तात्काळ प्रतिक्रिया दिल्याने अथवा छोट्या गोष्टी मनाला लावून घेतल्याने मोठे वाद निर्माण होतात. असे प्रकार टाळावे, खेळाडू वृत्ती वाढवावे….
धनु – सगळ्या जगाची चिंता करू नये. परंतु जो जे वांछील तो ते लाहो, असे असू द्यावे. आपण चिंता केल्याने त्रास आपणासच होतो, अशी विचारस्थिती टाळावी….
मकर – अनेक नवीन आर्थिक पर्याय व प्रस्ताव समोर येऊ शकतात. त्यातील विचारपूर्वक निवडावे. केवळ प्रलोभन स्वरूपातील पर्याय नुकसान करू शकतात….
कुंभ – चिंतन, मनन, धानधारणा, योगा, प्राणायाम यातील कौशल्य साधनेकडे या सप्ताहात विशेष लक्ष राहील. या सर्व साधनेचा विशेष उपयोग करण्याच्या दृष्टीने पुढील प्रयत्न असतील….
मीन – कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास स्वतःहून करून घेऊ नये. अति विचार टाळा. विचार तसेच मनस्थिती सकारात्मक ठेवा. कोणताही वाद तत्काळ मिटवा.……
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे….
दीपावली निमित्त नाशिक बाहेरील कुंडली रत्न वास्तू सल्ला विजिट एक नोव्हेंबर नंतर करण्यात येतील
भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत व्हाट्सअप ९३७३९१३४८४
…. सर्व वाचकांना उद्याच्या लक्ष्मी- कुबेर पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा????????