साप्ताहिक राशीभविष्य – १६ ते २३ ऑक्टोबर २०२२
मेष – शिक्षण विषय घडामोडी या सप्ताहात प्रामुख्याने घडू शकतात. विविध प्रकारच्या परीक्षा त्यासाठी आवश्यक. फॉर्म भरण्याची प्रक्रिया शैक्षणिक साहित्य या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे……
वृषभ – अर्थविषयक घडामोडी, आर्थिक देवाणघेवाण, कर्ज विषयक प्रकरणे हे या शब्दाचे विशेष आहे. या सर्व बाबतीतली आवश्यकता व त्याबाबत आवश्यक ती कागदपत्रे तयार असावीत…..
मिथुन – महत्त्वाच्या प्रसंगी ऐनवेळी होणारी विविध गोष्टींसाठीचे धावपळ या सप्ताहात होऊ नये याची काळजी घ्या. त्यासाठी महत्त्वाच्या घडामोडींबाबत अधिक अंदाज घ्या आणि त्याची तयारी ठेवणे महत्त्वाचे राहील….
कर्क – कायदेशीर घडामोडी, कायदेविषयक घटना, कायद्याची मदत घेणे या गोष्टी या सप्ताहात आवश्यक आहे. कायदेशीर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तयारी ठेवावी…..
सिंह – परिचित मित्रमंडळी यांचे मधील आपापसातील जुन्या कुरबुरी डोके वर काढण्याची शक्यता आहे. कोणताही विषय ताणून न धरता मध्यम मार्ग स्वीकारावा….
कन्या – आपल्या ज्या गोष्टी इतरांना आवडत नाहीत त्या मुद्दाम करणे टाळावे. कमीत कमी वाद होतील, असे पाहावे. आपल्याबद्दल गैरसमज होऊ नये याची काळजी घ्यावी….
तूळ – कला विश्वातील सहकाऱ्यांसाठी हा सप्ताह फार महत्त्वाचा. विविध बाबतीत नवीन संधी मिळणे, त्या संधीचे सोने करणे, कार्य गौरव होणे हे या सप्ताहात विशेष होय…
वृश्चिक – कौटुंबिक अथवा नातेवाईक विषयक महत्त्वाचे निर्णय घेणे. त्यातील काहींशी नातेसंबंधातील कटूता कमी करणे. संवाद वाढवणे. त्यासाठी आवश्यक ते प्रसंग तयार करणे. या सप्ताहात असू शकते….
धनु – धार्मिक घटना, शुभप्रसंग विशेष होय. धार्मिक समारंभात उपस्थिती, त्या दृष्टीने तयारी, शुभकार्यास सुरुवात. बरेच दिवस रंगाळलेली महत्त्वाची कुलदैवत विषयक कामे या सप्ताहात पूर्ण होतील….
मकर – क्रीडाविषयक घडामोडी. खेळाडूंना महत्त्वाचा संधी या सप्ताहात मिळू शकतात. खेळाडूंच्या करिअर बाबत महत्त्वाचे निर्णय या सप्ताहात होतील….
कुंभ – व्यापारी वर्गासाठी या सप्ताहात महत्त्वाचे निर्णय होतील. व्यापार विषयक महत्त्वाच्या घडामोडी. नवीन व्यावसायिक निर्णय. त्यासाठी आवश्यक भांडवल पुरवठा, या घटना समाविष्ट असतील…
मीन – वरिष्ठांची मर्जी सांभाळणे. वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे काम करणे, या सप्ताहात महत्त्वाचे आहे. वरिष्ठांची खप्पा मर्जी आपल्या करिअर वर परिणाम करू शकते. त्यामुळे आखीव रेखीव स्वरूपात कार्य असावे…..
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे…..
वास्तु- रत्न- कुंडली विषयक व्यक्तिगत मार्गदर्शन भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत व्हाट्सअप 93 73 91 34