साप्ताहिक राशिभविष्य
११ ते १८ डिसेंबर २०२२
मेष – या सप्ताहात आपण पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा होईल. उगाच पैसे अडकलेले असतील तर त्वरित अन्यत्र टाकावे…..
वृषभ – जुने वाद सांभाळणे आवश्यक आहे. मुख्यतः देण्याघेण्या संबंधात असू शकतात. जे काही बाकी असेल तो व्यवहार एकतर थांबवा अथवा पूर्ण करावा करावा …..
मिथुन – या सप्ताहात मुख्यतः महत्त्वाच्या जबाबदाऱ्या समोर येऊ शकतात. त्या पार पाडणे आवश्यक ठरू शकते. मानसिक व आर्थिक तयारी ठेवावी…..
कर्क – दिवाणी संबंधातील महत्त्वाची कामे या सप्ताहात पार पडतील. संबंधातील महत्त्वाचे कागदपत्र व्यवस्थित ठेवावे….
सिंह – हाडांच्या दुखण्याविषयक अथवा पाठ दुखीविषयी तक्रारी या उद्भवू शकतात. त्याबाबत अंगावर दुखणे न काढता योग्य ते उपाय करावे……
कन्या – आपण दिलेला सल्ला आपल्याला त्रासदायक ठरवू नये याची काळजी घ्यावी. अनोळखी व्यक्तीला सल्ला टाळावा…..
तूळ – बांधकाम विषयक अथवा एखाद्या नवीन साईट विषयक आपण दिलेली माहिती खूप जणांना उपयुक्त ठरणार आहे. त्याकरता या क्षेत्रात अजून नवीन काय करता येईल असे पहावे…..
वृश्चिक – दोघांचा वाद शत्रूचा लाभ अशी स्थिती टाळावी. कुणामध्ये मध्यस्थी करताना जरा जपूनच करावी…..
धनु – या सप्ताहात मुख्यतः सरकारी तसेच महत्त्वाची रंगाळलेली कामे पार पडतील. बाकी असलेले आर्थिक प्रकरण मार्गी लागेल. सार्वजनिक कार्यात सहभाग राहील….
मकर – वरिष्ठांची मर्जी सांभाळणे, ज्येष्ठांच्या मतानुसार काम करणे, वरिष्ठांचा सल्ला मानणे, नोकरी अथवा व्यवसायात वरिष्ठांची खप्पा मर्जी टाळणे, या सप्ताहात करावी लागेल……
कुंभ – नूतन वास्तू विषयक व्यवहार अथवा नूतन प्लॉट विषयक व्यवहार या सप्ताहात होण्याची शक्यता आहे. तसे असेल तर तज्ञांच्या मदतीने घराचा व्यवहार पूर्ण करावा…….
मीन – नवीन व्यवसायाबाबत चर्चा तसेच व्यवसायाचे धोरण ठरवले जाईल. त्याबाबत करार करणे, नवीन व्यवसाय संबंधित सर्व तयारी करणे या हप्त्यात होऊ शकते…..
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.
(सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिषालय पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)