साप्ताहिक राशिभविष्य
– १ ते ८ जानेवारी २०२३ –
मेष – महत्त्वाच्या खरेदीची लगबग. बऱ्याच दिवसांनी महत्त्वाचे नातेवाईक भेटतील. विद्यार्थ्यांसाठी शुभ वार्ता. ऐकावे जनाचे करावे मनाचे……
वृषभ – मेहनतीला यश मिळेल. कार्य गौरव होईल. कलाकारांना शुभ वार्ता मिळेल. जुन्या अनुभवाने आर्थिक निर्णय घ्या….
मिथुन – योग्य न वाटणाऱ्या व्यवहारात सौम्य शब्दात नकार द्या. आर्थिक अतिधाडस टाळावे. या सप्ताहात महत्त्वाचे करार मदार करताना सावधानता बाळगावी….
कर्क – उत्पन्नाचे ताळमेळ साधताना कसरत होईल. परिस्थितीनुसार योग्य मोठा आर्थिक निर्णय घ्या. नातेसंबंध सांभाळा…..
सिंह – दैनंदिनी सांभाळा. दूरचा प्रवास. आरोग्य सांभाळा. आपली भूमिका समजून न घेता गैरसमज होण्याची शक्यता. त्यामुळे विचारपूर्वक मध्यस्थी करा…..
कन्या – रेंगाळलेल्या आर्थिक वाटाघाटी यशस्वी होतील. मनासारखी आवक राहील. जमीन जुमला विषयक शुभवार्ता मिळेल…..
तूळ – आपण दिलेल्या सल्ल्याने फायदा झाला तरी त्याचे श्रेय आपणास मिळेल ही अपेक्षा नको. वास्तविकता स्वीकारा. ऐनवेळी जुनी गुंतवणूक उपयोगी येईल…..
वृश्चिक – स्पष्टवक्तेपणा समोरच्या व्यक्तीला योग्य वाटेलच असे नाही. कडवट शब्दांपेक्षा योग्य शब्दात चांगली भूमिका मांडू शकाल….
धनु – आपल्या इच्छा-आकांक्षा योग्य वेळी, योग्य व्यक्ती समोर व्यक्त कराव्यात. न बोलल्यास गैरसमज होतो….
मकर – संवाद नसलेल्या व्यक्तींसोबत बोलण्याची हुरहुर राहील. त्याबाबत आपण स्वतः पुढाकार घ्यावा. जिव्हाळ्याचे संबंध सांभाळावे……
कुंभ – वाटाघाटी करताना मुत्सद्दीपणा आवश्यक आहे. चर्चा यशस्वी होईल या पद्धतीने सकारात्मक वातावरण असावे…..
मीन – नवीन वर्षात वास्तवतापूर्ण निर्णय घ्यावे लागू शकतात. कर्ज प्रकरणे सांभाळा. आपण बरे आपले काम बरे असे ठेवावे……
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.
(सविस्तर मार्गदर्शनासाठी पंडित दिनेश पंत whatsapp 93 73 91 34 84)…..
सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा