पंडित दिनेश पंत, नाशिक
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीनंतर सर्वांना वेध लागतात ते लग्नसराईचे. येत्या १५ नोव्हेंबरला तुलसी विवाह असून त्याच दिवसांपासून लग्न समारंभांचा बार उडणार आहे. पुढील दोन महिन्यात विवाहाच्या तब्बल १२ मुहुर्त आहेत. त्यामुळे कोरोना लॉकडाऊनमुळे थांबलेले विवाह समारंभ आता धडाक्यात होणार आहेत. तसेच, यंदाच्या लग्न सराईमध्ये तब्बल ५७ विवाह मुहुर्त आहेत. त्यामुळे वधूवरांसह त्यांच्या कुटुंबियांसाठी ही बाब दिलासादायक ठरणार आहे.
विवाह मुहूर्त असे
(नोव्हेंबर 2021 ते डिसेंबर 2022)
नोव्हेंबर 2021
15,16, 20, 21, 28, 29, 30 नोव्हेंबर
डिसेंबर 2021
1,2, 6,7, 11, 13 डिसेंबर
जानेवारी 2022
15, 20, 23, 27, 29 जानेवारी
फेब्रुवारी 2022
15, 11, 18, 21, 22 फेब्रुवारी
(मार्च 22 मुहूर्त नाहीत)
एप्रिल 2022
17, 19, 21, 22, 23, 28 एप्रिल
मे 2022
2,3, 9, 10, 11, 12, 13, 17, 18, 20, 25, 26, 31 मे
जून 2022
6, 8, 11, 12, 13, 14, 15, 16, 22 जून
जुलै 2022
3,5,6,8 जुलै
(ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मुहूर्त नाहीत)
नोव्हेंबर 2022
21, 22, 24, 25, 26, 27, 28 नोव्हेंबर
डिसेंबर 22
2,3,7, 8,9, 14 डिसेंबर
विविध ठिकाणाहून हे मुहूर्त संकलन केलेले आहेत. वरील मुहूर्ताच्या तारखां व्यतिरिक्त शुभ दिवस पाहणे असल्यास त्याचप्रमाणे मुहूर्त वेळेसाठी आपल्याकडील वधू-वरांच्या कुंडली नुसार तज्ञ ज्योतिषांकडून मुहूर्ताच्या वेळा काढून घ्याव्यात.