इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लग्न समारंभात एका महिलेचा शस्त्रांसोबत फोटो ट्विटरवर व्हायरल झाला आहे. चार फोटोंमध्ये महिलेच्या हातात दोन शस्त्र दिसत आहेत. हा फोटो व्हायरल होताच ट्विटरवर गाझियाबाद पोलिसांनी खोडा पोलिस स्टेशनला चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
जेव्हा या महिलेचा फोटो ट्विटरवर व्हायरल झाला तेव्हा अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देत कारवाईची मागणी केली. या महिलेचे नाव आरती असल्याचे पोस्टमध्ये नमूद करण्यात आले असून, ती खोडा येथील रहिवासी आहे. या व्हायरल फोटोंनंतर या महिलेकडे एवढी धोकादायक शस्त्रे कुठून आली आणि लग्न समारंभासारख्या सार्वजनिक कार्यक्रमात ही शस्त्रे महिलेकडे कोणी दिली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. व्हायरल झालेल्या छायाचित्रात एक तरुणीही शस्त्रांसह तिच्या मागे उभी असल्याचं दिसून येत आहे.
सुदैवाने घटनास्थळी कोणतीही मोठी घटना घडल्याचे दिसून आले नाही. या प्रकरणी खोडा पोलिस स्टेशनचे प्रभारी ब्रिजेश कुमार कुशवाह यांनी सांगितले की, लग्न समारंभाचे ठिकाण नोएडाचे आहे, महिला खोडा येथील रहिवासी आहे. या शस्त्रांस्त्रांचा त्या महिलेशी काय संबंध याबाबत पोलीस तपास करत आहेत.
साखरपुड्यादरम्यान गोळीबार
सालेहनगर लोनी येथील शेतात सुरू असलेल्या साखरपुडा सोहळ्यात काही तरुणांनी गोळीबार केल्याचा व्हिडिओही बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी तरूणाची ओळख पटवली असून एकाचा समावेश असून अज्ञाताविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. लोनीचे सीओ रजनीश कुमार उपाध्याय यांनी सांगितले की, गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये समारंभात दोन तरुण वेगवेगळी शस्त्रे घेऊन उभे आहेत. त्यापैकी उभ्या असलेल्या तरुणाने शस्त्राने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. पण गोळी सुटली नाही. त्यानंतर तेथे उभ्या असलेल्या अन्य तरुणांनी त्याच्यावर अन्य शस्त्राने गोळीबार केला.
गोळीबार सुरू असताना आणखी काही तरुणही तिथे उभे आहेत. तर दुसरा तरुण गोळीबार करतानाचा व्हिडिओ बनवत होता. या गोळीबारामुळे काही अनुचित प्रकार तिथे घडू शकला असता. लोनी सीओने सांगितले की, व्हायरल व्हिडिओसोबत एक मेसेजही सुरू आहे, ज्यामध्ये साबू नावाचा व्यक्ती गोळीबार करत असल्याचे लिहिले आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर हा व्हिडिओ सालेहनगर कॉलनीतील असल्याचे आढळून आले. येथे मैदानात पंडाल लावून साखरपुडा सोहळा सुरू होता. गोळीबार करणाऱ्याची ओळख पटली आहे. आदर्शविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अटकेचा प्रयत्न पोलीस करत आहेत.