इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लग्नात नाचण्याची हौस पूर्ण करणाऱ्यांची संख्या कमी नसते. मात्र, कधीकधी ही हौस अंगलटदेखील येते. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे घडला असून नागिन नाचवरून दोन्ही बाजूकडील वऱ्हाड्यांमध्ये झालेल्या भांडणात पाच जण जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.
लग्नातील रुसवे-फुगवे, मानापमान नाट्य हे नित्याचे आहे. जवळपास सर्वच लग्नांमध्ये अशा घटना घडत असतात. मात्र, नागिन डान्समुळे भांडण होऊन पाच जणांचा मृत्यू झाल्याचा प्रकार दुर्मिळ म्हणावा असाच आहे. ही घटना १६ मार्च रोजी रात्री घडली. वरात वाजत-गाजत मुलीच्या घराकडे निघाली होती. त्याचवेळी काही पाहुण्यांनी नागिन डान्सची धून वाजवायला सांगितली. त्यामुळे वरातीत सहभागी झालेले काही लोक संतापले तर काही नाराज झाले. त्यावरून दोन्ही बाजुच्या लोकांमध्ये वाद झाला.
काही गोष्टींवरून पुढे वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार हाणामारी झाली. लग्नामध्ये झालेल्या या गोंधळात पाच जण जखमी झाले. हाणामारीनंतर वरातीत चेंगराचेंगरी झाली. सर्व जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र मितौली येथे दाखल करण्यात आले. गोंधळ झाल्यानंतर वरातीत सहभागी ज्येष्ठांनी समज देऊन प्रकरण शांत केले. मुलाचा भाऊ कल्लू याने याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. गाण्यावरून वरातीत झालेल्या भांडणाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Wedding Ceremony Fight Crime 5 Injured Nagin Dance