इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळात मुलगा आणि मुलगी हा भेद समाजातील काही प्रमाणात कमी होत आहे. सामाजिक दृष्ट्या ही अत्यंत स्वागतार्ह आणि आनंदाची गोष्ट आहे, कारण बहुतांशी कुटुंबांमध्ये मुलीला देखील मुला इतकेच अधिकाराने त्याच्या मिळत आहेत. किंबहुना मुलगी मातापित्यांची खूप लाडकी असल्याने तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पालक धडपडत असतात. इतकेच नव्हे तर तिच्या लग्नप्रसंगी काही कमी पडू नये, याची काळजी घेत असतात. पारंपारिक पद्धतीने प्रथा आणि परंपरेचे पालन करत असताना लग्न समारंभामध्ये नवरदेवाची मिरवणूक काढली जाते. परंतु अलीकडच्या काळात वधू देखील मिरवणूक काढण्यात येत असल्याचे दिसून येते. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ही अशीच घटना घडली.
आपल्या लाडक्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भोपाळमधील एका वडिलांनी अनोखी मिरवणूक काढली आहे. वधू मिरवणुकीसह लग्नस्थळी पोहोचली. तिची बालपणीची इच्छा पूर्ण झाल्याने मैत्रिणींसह खुल्या गाडीत डान्स करून आनंद व्यक्त केला. संत हिरडाराम नगरमध्ये लालवानी परिवारातील दोन भावंडांच्या कुटुंबात वाढलेल्या भावना ललवाणी हिची इच्छा पूर्ण करण्यासाठी वडिलांनी समाजाच्या परंपरेला बगल देत कन्या वधूची वरातीसारखी मिरवणूक काढली. एमसीए केल्यानंतर इंदूरमधील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या भावनाला तिची इच्छा पूर्ण झाल्यामुळे आनंद झाला. जेव्हा संत हिरडाराम नगरच्या बाजारपेठेतून ही मिरवणूक निघाली तेव्हा सर्वांच्याच नजरा त्यावर खिळल्या आणि ही वरात आकर्षणाचे केंद्र ठरली.
भावनाची मिरवणूक सुमारे एक किलोमीटर उघड्या गाडीतून निघाली. यामध्ये वराने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता आणि वधूने तपकिरी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. यावेळी डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
यावेळी दिल्ली वाली गर्लफ्रेंड, छोरे छोरे…, लैला में लैना… अशा चित्रपटांच्या सुरांवर खुल्या कारच्या बोनेटवर नृत्य करत भावनाने आपला आनंद व्यक्त केला. तसेच नववधू भावना म्हणाली की, तिने घरच्यांना एक अट घातली होती की, जोपर्यंत लग्नात तिची मिरवणूक निघत नाही, तोपर्यंत ती लग्न करणार नाही. आता तिची मिरवणूक निघत असल्याने तिच्या आनंदाचा पारावार राहीला नाही.