इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या लग्नाचा मोसम असून देशभरात अनेक ठिकाणी समारंभ धूमधडाक्यात सुरू आहे. लग्न म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नसून त्याला सामाजिक आणि कौटुंबिक आधार असतो. नववधू आणि वर एकमेकाला केवळ अनुरूप चालत नाही, तर त्यांच्यामध्ये एकमेकाला समजून घेण्याची तसेच आवड निवड जोपासण्याची गरज असते. परंतु काही वेळा वधू आणि वर यांच्यात योग्य विचार जुळत नाहीत, त्यातूनच मग लग्न देखील मोडते अशीच एक घटना उत्तराखंड मध्ये घडली.
खरे म्हणजे दारूडा नवरा कोणालाही आवडत नाही, त्यातच चक्क नवरदेवच दारू पिऊन आल्याने वधू संतप्त झाली. या वधूने मद्यधुंद वराशी लग्नास नकार दिला. दोन्ही पक्षांनी वधूची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती मान्य झाली नाही. शेवटी वधूने संपूर्ण मिरवणूक परत पाठवली. ही बाब परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच नववधूच्या धाडसाचे आणि निर्णयाचे नागरिक कौतुक करत आहेत.
पौरी जिल्ह्यातील एका गावातून ही मिरवणूक झंडीचौड पूर्व गावात आली होती. मिरवणूक घराजवळील मंडपात पोहोचताच वरात घोड्यावरून उतरताच त्याचे पाय अडखळले. त्यामुळे तो नशेत असल्याचे निष्पन्न झाले. मग काही वेळात ही गोष्ट वधूच्या कानावर गेली. तिची खात्री केल्यानंतर वधूने मद्यधुंद वराशी लग्न करण्यास नकार दिला.
वधूच्या या निर्णयामुळे वऱ्हाडी मंडळींमध्ये खळबळ उडाली. वधूपक्षाकडील मंडळीही नाराज झाले. ही वराची चूक असल्याचे सांगून त्याने वधूला त्याला माफ करण्यास सांगितले. वरपक्षांनी माफी मागून वधूचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण ती वधू मान्य लग्नाला तयार झाली नाही. मात्र वधूपक्षाने वराच्या मिरवणुकीती मंडळीला जेवण खाऊ घालून परत पाठवले.
दरम्यान, काही गावकऱ्यांनी सांगितले की, लग्नाच्या मिरवणुकीचे स्वागत होत असतानाही वराला एवढी नशा होती की त्याला नीट उभेही राहता येत नव्हते. दारूच्या नशेत लग्नाला आलेल्या तरुणासोबत आयुष्य कसे घालवणार? असे नववधूने म्हणणे होते.