इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लग्नानंतर पती पत्नीचे भांडण, कुरबुरी किंवा वादविवाद ही सर्वसामान्य गोष्ट मानली जाते. परंतु एखाद्या लग्न प्रसंगी नवरदेव व नवरीचे भांडणे होणे ही मात्र निश्चितच आश्चर्याची गोष्ट म्हणावी लागेल. कारण दोघेही या प्रसंगी एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात. मात्र बिहारमध्ये या मंगल प्रसंगी वधू-वरांचे कडाक्याचे भांडण झाले. तेही मंगलाष्टक सुरू असतानाच.
बिहारची राजधानी पाटणा येथे ही अनोखी घटना समोर आली आहे. एका लग्न समारंभात येथे हाय व्होल्टेज ड्रामा घडला. मंगलाष्टक समारंभ सुरू असताना वधू आणि वरात भांडण झाले. हे प्रकरण इतके वाढले की लग्नाचे पुढचे विधी पूर्ण होऊ शकले नाही आणि नवरीने सासरच्या घरी जाण्याऐवजी ती थेट पोलिस ठाण्यात गेली.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा येथील गरदानीबाग येथील एका कम्युनिटी हॉलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. वराची मिरवणूक आली आणि काही कारणावरून वधू आणि वरात भांडण झाले. त्यामुळे संपूर्ण विवाह सोहळा होऊ शकला नाही. नववधूने सासरच्या घरी जाण्याऐवजी गार्डनीबाग पोलिस ठाणे गाठले.
सासरच्यांनी पैशाचीकडे मागणी केल्याचा आरोप वधूने केला आहे. तिच्या कुटुंबीयांनी याबाबत असमर्थता व्यक्त केल्यावर वराने लग्न न करताच स्टेज सोडले, असे तिने सांगितले. परंतु पोलिसांनी समजुत घेतल्यानंतर दोन्ही पक्षांचे एकमत करण्याचे ठरले. यानंतर पोलिसांनी वराच्या बाजूच्या मंडळीना पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले. तेव्हा वधूने पुन्हा पोलिस स्टेशन गाठले आणि कोणतीही केस करू नका, असे सांगितले.
मात्र, आता वराच्या बाजूच्या मंडळीनी आरोप केला की, मंगलाष्टक सुरू असताना पुष्पहार घालते वेळी फोटो क्लिक करत असताना वधू स्टेज सोडून निघून गेली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांची समजूत घालून कोर्ट मॅरेज करण्यास सांगितले.
wedding bride and groom fight on stage after that crime police allegation