मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी पावसाने उघडीप घेतली आहे. हवामानात झालेले बदल पुढेही कायम राहणार असून पुढील ५ दिवस उघडीप, पण राज्यात पुन्हा दमदार पाऊस परतणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला असून अनेक ठिकाणी पावसाचा मोठा फटका बसला आहे. राज्यातील काही धरणे भरली आहे. तर पाऊस हा आता हळूहळू ओसरत आहे.
मंगळवार, बुधवारनंतर पाऊस उघडीप घेईल, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. तर, राज्यातील बऱ्याच भागात पावसाने उसंत घेतलेली पाहायला मिळाली. मुंबईतही आता पावसाचा जोर ओसरलेला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी पावसाने उघडीप घेतली आहे. हवामानात झालेले बदल पुढेही कायम राहणार असून, ३१ जुलैपासून ४ ऑगस्टपर्यंत मध्य महाराष्ट्रातील १० व मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत अशा एकूण १८ जिल्ह्यांत पावसाची अधिक उघडीपीची शक्यता आहे.
मुंबईसह कोकणातील ४, विदर्भातील १० जिल्ह्यांत व दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यात तशीच परिस्थिती आहे. तसेच, ५ ते १५ ऑगस्टपर्यंत माॅन्सून पुन्हा ऊर्जितावस्थेत येऊन महाराष्ट्रात पुन्हा चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. दरम्यान, काल सातारा जिल्ह्यात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. वाई, पाचगणी परिसरात जोरदार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. तसेच बीड जिल्ह्यातही काही भागात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने प्रंचड नुकसान झाले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या 14 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग-1, घाटकोपर-1) -2, पालघर -1,रायगड- महाड- 2, ठाणे-2, रत्नागिरी-चिपळूण-2, कोल्हापूर-2, सातारा-1, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) एकूण 12 पथक तैनात आहेत. नांदेड-1, गडचिरोली-1 अशा राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या दोन तुकड्या तैनात केलेल्या आहेत.
राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती
राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे 28 जिल्हे व 313 गावे प्रभावित झाली असून 83 तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत. 14 हजार 480 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे 112 नगरिकांनी आपला जीव गमावला आहे, तर 223 पशुधन दगावले आहेत. 44 घरांचे पूर्णत: तर 2 हजार 086 घरांचे अंशत: नुकसान झालेले आहे. राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात आला आहे.
1 ऑगस्ट, पुढचे 3,4 दिवस राज्यात काही ठिकाणी मेघ गर्जनेसह ?? पावसाची शक्यता.
4,5 व्या दिवशी कोकणात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता.?☔☔ pic.twitter.com/WsXF3dZqdO— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 1, 2022
Weather Rainfall Prediction Climate Maharashtra Monsoon