अवकाळी पावसाचे सावट अजून आठवडाभर
गेल्या तीन आठवड्यापासून समुद्रसपाटी पासुन ९०० मीटर उंचीपर्यंतच्या हवेच्या जाडीत दक्षिणोत्तर पसरलेला हवेच्या कमी दाबाचा आस व त्यातुन विशेषतः दक्षिण व दक्षिण-मध्य भारतात नाचणारी ‘ वारा खंडितता ‘ प्रणालीमुळे सध्या आपण गारपीट व अवकाळी वातावरणाचा अनुभव घेत आहोत.

ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्,
भारतीय हवामान खाते, पुणे.
मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५
हे वातावरण अजुन आठवडाभर म्हणजे शनिवार दि.१५ एप्रिलपर्यंतही जाणवू शकते. परंतु ह्या वातावरणात गारपीट होण्याची शक्यता कदाचित मावळलेली असेल असे वाटते. परंतु आज मराठवाड्यात गारपीट मात्र होवु शकते, असे वाटते. उर्वरित महाराष्ट्रात मात्र अवकाळी वातावरणच जाणवेल, असे वाटते.
आज हीच ‘ वारा खंडितता ‘ प्रणाली खान्देश ते कर्नाटकातून केरळपर्यन्त दक्षिणोत्तर पसरलेली असल्यामुळे आज आज तरी कोकण वगळता महाराष्ट्रात अवकाळी वातावरणाची तीव्रता अधिक जाणवेल. मुंबईसह कोकणात वातावरण असेल पण तीव्रता काहीशी कमी जाणवेल.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1644628352165203968?s=20
Weather Climate Forecast Maharashtra Unseasonal Rainfall