मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पश्चिम विक्षोभामुळे महाराष्ट्राच्या हवामानावर मोठा परिणाम होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने तशी माहिती दिली आहे. त्यामुळेच पुढचे काही दिवस राज्याच्या काही भागात पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी तशी माहिती दिली आहे.
होसाळीकर यांनी म्हटले आहे की, उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम राज्यात होणार आहे. त्यामुळेच काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे. येत्या १० जानेवारीपर्यंत राज्याच्या काही भागांमध्ये ढगांचा गडगडाट/विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, ९ जानेवारीला विदर्भातील काही भागात गारपीट होण्याचा अंदाज आहे.
८ जानेवारी – जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला, जालना, वाशिम, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात पावसाचा इशारा
९ जानेवारी – बुलडाणा, अकोला, परभणी, जालना, नांदेड, हिंगोली, वाशिम, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात पावसाचा इशारा
१० जानेवारी – अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात पावसासह गारपीटीचा इशारा
अधिक माहितीसाठी खालील नकाशा पहावा