मुकुंद बाविस्कर, मुंबई
कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेमुळे आपल्या देशभराची मोठी जैविक आणि आर्थिक हानी होत आहे. त्यातच काही तज्ज्ञ आता तिसर्या लाटेचा इशारा देत आहेत. अशा परिस्थितीत भारत कोणत्याही जैविक युद्धाचा बळी तर ठरणार नाही, कारण अचानक वैद्यकीय यंत्रणा नष्ट करून आणखी मोठ्या प्रमाणात विनाश होऊ शकतो, त्यामुळे जैविक युद्धासाठी आपल्याला तयार राहावे लागेल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
एकीकडे भारत आणि अमेरिकेसह जगातील सर्वच देश कोरोनाच्या तावडीतून स्वत: ला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे चीन सतत आपला व्हायरस अपडेट करत असतो आणि आपल्या शत्रू देशांना आरोग्य यंत्रणेमध्ये अडकवून ठेवू इच्छित असल्याचेही दिसून येते. आता नवीन रूपांतरीत विषाणू किंवा आजार हा अद्ययावत व्हायरसच असण्याची शक्यता आहे.
आतापर्यंतच्या सर्व तथ्ये सूचित करतात की, चीन या समस्येचे मूळ कारण आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण जागतिक समुदायाला चीनविरूद्ध एकवटून उभे राहावे लागेल. तसेच भविष्यात जैविक शस्त्रे किंवा कोणत्याही प्रकारच्या जैविक युद्धाचा सामना करण्यासाठी मोठी तयारी करावी लागेल. आहे. गेल्या वर्षभरात कोरोना विषाणू कसा आणि कोठून आला याबद्दल बर्याच चर्चा केल्या गेल्या आहेत, परंतु अलीकडेच त्यासंदर्भात काही धक्कादायक तथ्य समोर आले आहे.
कोविड -१९ या महामारीच्या पाच वर्षांपूर्वी चिनी शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूचा उपयोग जैविक शस्त्रे म्हणून केल्याचा तपास केला असून त्यांनी जैविक शस्त्राशी लढणार्या तिसऱ्या महायुद्धाचा अंदाज वर्तविला. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून प्राप्त झालेल्या कागदपत्रांचा हवाला देत एका मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा केला गेला आहे की, चिनी वैज्ञानिकांनी सार्स कोरोना विषाणूचा उल्लेख ‘जैविक शस्त्रास्त्राचा नवीन युग’ म्हणून केला, त्याचे एक उदाहरण म्हणजे कोविड१९ होय.
त्याचप्रमाणे चीनमध्ये त्यापुर्वी पसरलेला एसएआरएस हा मानवनिर्मित जैव शस्त्र असू शकतो, जो दहशतवाद्यांनी मुद्दाम पसरविला होता. अमेरिकेच्या अहवालानुसार, शत्रू देशांची अर्थव्यवस्था व वैद्यकीय व्यवस्था नष्ट करण्यासाठी चीनने कोरोना विषाणूचा उपयोग जैविक शस्त्र म्हणून केला आहे. अमेरिकेसमवेत व्यापार युद्धावर चीनला नियंत्रण ठेवायचे होते, यासाठी त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांना मार्गातून दूर करावे लागले. खरे तर ट्रम्प चीनच्या विरूध्द ठाम उभे राहिले. तेव्हाच ट्रम्प म्हणाले होते की, वुहानमधील केंद्रबिंदू येथे चीनने व्हायरस ठेवला आहे, जिथे जगभरातील लोक काम करतात. चीनच्या इतर शहरांमध्ये त्याचा प्रभाव फारच कमी आहे. परंतु इतर देशांमध्ये त्याचा नंतर भंयकर त्रास झाला.
वस्तुतः जेव्हा वुहानची परिस्थिती खराब होऊ लागली किंवा ती खराब झाली तेव्हा इतर देशांतील लोकांना त्यांचा देश सोडून जाण्यास भाग पाडले गेले. भारत आणि अमेरिका यांनी आपल्या नागरिकांना विमानातून आणले. त्या प्रवाशांबरोबरच चिनी विषाणूने देखील परदेशात उड्डाण केले आणि भारतासह अन्य मोठ्या संख्येने लोकांना संक्रमित करण्यास सुरवात केली.
मात्र भारताप्रमाणेच अमेरिकेनेही पहिल्या लाटेकडे दुर्लक्ष आणि कोणतीही हालचाल न करता चीनची छुपी योजना यशस्वी झाली. दुसरीकडे, त्याचा उद्रेक होताच, चिनी लस बाजारात दाखल झाली. संपूर्ण जगाला आश्चर्य वाटले की, व्हायरसचे विश्लेषण देखील अद्याप सुरू झालेले नाही, तर चीनी शास्त्रज्ञ लसवर संशोधन करत असताना चीननेही लस विकायला सुरुवात केली.
विशेष म्हणजे जेव्हा वुहानमध्ये पहिल्यांदा चीनने लॉकडाउन लादले तेव्हा लॉकडाऊन कोरोना संपू शकतो हे चीन्यांना कसे कळले ? याची अमेरिकेला आश्चर्य वाटले. त्याच लॉकडाऊनमध्ये चीनने आपल्या सर्व नागरिकांना लसीकरण केले होते आणि काही महिन्यांत संपूर्ण चीनमध्ये लसीकरण पूर्ण झाले. चीनने यापूर्वीच लस ठेवून आपल्या लोकांची सुटका केली आहे आणि आता जगभरात कोरोना फैलावून चीनने लसीचा कच्चा मालही विकला आहे.