बुधवार, ऑगस्ट 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

वेव्हज २०२५…टेलिव्हिजन आणि ऑनलाईन क्युरेटेड कंटेंट उद्योगाच्या आर्थिक योगदानावरील अहवाल या विषयावर परिसंवाद

by Gautam Sancheti
मे 4, 2025 | 6:22 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
GqBBkVTXcAArXcv 1024x682 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-मनोरंजनाच्या स्पर्धेत यशस्वी होत दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी कोणत्याही माध्यमातून व्यक्त होताना आशयघन मांडणी महत्त्वाची बाब आहे. त्यादृष्टीने स्थानिक विषयावरील सकस आशय निर्मिती जागतिक स्तरावर प्रभावशाली ठरते, असे मत ज्येष्ठ निर्मितीतज्ज्ञ डिबेरा रिचर्ड्स यांनी व्यक्त केले.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित “वेव्हज २०२५, दृकश्राव्य मनोरंजन समिट”मध्ये टेलिव्हिजन आणि ऑनलाईन क्युरेटेड कंटेंट (OCC) उद्योगाच्या आर्थिक योगदानावरील MPA अहवाल या विषयावर आयोजित परिसंवादात रिचर्ड्स बोलत होत्या. या परिसंवादात केलेय डे, केवीन वज्झ, डिबेरा रिचर्ड्स, केटीलीन यार्नल, जस्टीन वाररोके हे तज्ज्ञ सहभागी झाले होते. या परिसंवादाचे सूत्रसंचालन उर्मिला वेणूगोपालन यांनी केले.

मोशन पिक्चर असोसिएशन (MPA) टेलिव्हिजन आणि ऑनलाईन क्युरेटेड कंटेंट (OCC) उद्योगाच्या आर्थिक योगदानावरील अहवाल या क्षेत्राच्या नवोपक्रम, रोजगार निर्मिती आणि डिजिटल अर्थव्यवस्थेवरच्या वाढत्या प्रभावावर प्रकाश टाकतो. या अनुषंगाने या परिसंवादात बदल्यात काळात टेलीव्हीजन आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सक्षम ठरणार आहे, यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

यामध्ये प्रामुख्याने ग्राहकांना कोणत्या माध्यमातून आपल्याला अपेक्षित आशय ग्रहण करण्याची इच्छा होते, हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी ग्राहकांचा असणार आहे, असे मत व्यक्त करण्यात आले. त्याचवेळी ग्राहकांकडून टेलिव्हिजन,ओटीटी किंवा त्यांना उपलब्ध असलेल्या कोणत्याही स्क्रीनवर ते आपल्या आवडीनुसार आवश्यक तो मजकूर,आशय बघतील, ऐकतील, यामध्ये महत्त्वाची ठरणारी गोष्ट आहे. ती‌ त्या आशयाची गुणवत्ता आणि दर्जा, कारण आशय जितका‌ आकर्षक, उपयुक्त आणि माहितीपूर्ण पद्धतीने मांडला जाईल, त्यानुसार त्याला ग्राहकांची पसंती आणि बाजारपेठेत आपले स्थान बळकट करणे शक्य होईल, त्यामुळे उत्कृष्ट आशय निर्मितीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

त्याचप्रमाणे मनोरंजनाच्या स्पर्धेत यशस्वी होणे आणि दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी आशयाची संपन्नता सर्वाधिक महत्त्वपूर्ण ठरणारी बाब आहे. हे लक्षात घेऊन स्थानिक ग्राहकांच्या आवडीनिवडी, गरजा आणि त्यातील आशय निर्मितीचे मूल्य समजून घेणे, आवश्यक आहे. स्थानिक पातळीवर जे प्रभावी, लक्षवेधक असते आणि ग्राहकांना भावते ते जागतिक पातळीवरही प्रकर्षाने यशस्वी ठरते. लोकल ते ग्लोबल हे सूत्र आशय निर्मिती करताना मध्यवर्ती असले पाहिजे, असे मत यावेळी परिसंवादात सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींना आरोग्याची चिंता सतावेल, जाणून घ्या, रविवार, ४ एप्रिलचे राशिभविष्य

Next Post

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट…ही झाली चर्चा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
GqB7o6HXYAA7Oy

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट...ही झाली चर्चा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी घरामध्ये वादाचे प्रसंग टाळलेले बरे, जाणून घ्या, गुरुवार, २१ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 20, 2025
IMG 20250820 WA0386

नाशिक जिल्हा परिषद पंचायत विकास निर्देशांकात राज्यात अव्वल…यांच्या हस्ते होणार गौरव

ऑगस्ट 20, 2025
election 1

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या…सहकार विभागाने घेतला हा निर्णय

ऑगस्ट 20, 2025
fda1

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई…मिठाईचा २४ हजाराचा साठा जप्त

ऑगस्ट 20, 2025
प्रातिनिधिक फोटो

कारमधून आलेल्या नागासाधूने संमोहन करुन व्यावसायीकास लुटले, रोकडसह हातातील सोन्याची अंगठी केली लंपास

ऑगस्ट 20, 2025
Sale KV Static blue 1x1 copy 1 e1755691438850

फ्लिपकार्टवर पोको एम७ प्‍लस ५जीच्‍या विक्रीला सुरूवात…ही आहे किंमत

ऑगस्ट 20, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011