गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

जागतिक माध्यम संवाद २०२५ : सदस्य राष्ट्रांद्वारे वेव्हज जाहीरनाम्याचा स्वीकार

by Gautam Sancheti
मे 3, 2025 | 6:15 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
waves 1 1024x341 1


मुंबई(इंडिया दर्पण वृत्तसेवा)-सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी परस्परांच्या सांस्कृतिक संवेदनशीलता जाणून जागतिक सहकार्य हाच प्रगतीचा मार्ग आहे.” सध्या सुरू असलेल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेदरम्यान (वेव्हज २०२५) मुंबईत झालेल्या जागतिक माध्यम संवादाच्या अनेक निष्कर्षांपैकी हा एक निष्कर्ष होता. डिजिटल दरी कमी करण्याच्या मार्गावर आपण सर्वजण वाटचाल करत असताना देशांमध्ये सर्जनशील जागा वाढवणे ही आपल्या सामूहिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे, याची अनुभूती संवादात सहभागी झालेल्या राष्ट्रांनी घेतली. वाढत्या जागतिकीकरण झालेल्या माध्यम वातावरणात जागतिक शांतता आणि सौहार्द वाढविण्यासाठी सरकारांच्या भूमिकेवर हा संवाद केंद्रित होता, ज्याची सांगता सदस्य राष्ट्रांनी वेव्हज जाहीरनामा स्वीकारून झाली.

जगभरातील संस्कृतींचे चित्रण करणारे चित्रपट लोकांमधील जिव्हाळा वाढवण्याची प्रचंड क्षमता बाळगतात या भावनेला जागतिक माध्यम संवादाने प्रतिध्वनीत केले आणि सहभागी राष्ट्रांनी या संदर्भात भारतीय चित्रपटांच्या भूमिकेची प्रशंसा केली. कथाकथनाचे एक मनोरंजक स्वरूप म्हणून, चित्रपट परस्परांशी सहयोग करण्यासाठी बलशाली ठरतात. कथाकथनाच्या कलेत तंत्रज्ञानाचा संगम मनोरंजन जगाला पुन्हा परिभाषित करत असताना, सर्जकांच्या अर्थव्यवस्थेत बलशाली म्हणून वैयक्तिक कथा देखील वेगाने उदयास येत आहेत. काही सदस्य राष्ट्रांनी “जबाबदार पत्रकारितेला” प्रोत्साहन देण्याच्या गरजेबद्दल चिंता व्यक्त केली. वेव्हज च्या मंचावर परस्पर सहकार्याने यावर तोडगा निघेल असे त्यांना वाटले.
वेव्हज २०२५ ला जागतिक समुदायाचे सूक्ष्म जग म्हणून संबोधित करताना, भारत सरकारचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, ही शिखर परिषद माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी भविष्यातील रूपरेषा ठरवण्यासाठी सर्जक, धोरणकर्ते, अभिनेते, लेखक, निर्माते आणि पडद्यावरील कलाकारांना एका समान मंचावर एकत्र आणते.

जागतिक माध्यम संवाद, २०२५ मधील आपल्या भाषणादरम्यान डॉ. जयशंकर यांनी विचाराधीन असलेल्या व्यापक रूपरेषांवर प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की जागतिक व्यवस्था, ज्याला एक मजबूत सांस्कृतिक आयाम आहे, आज परिवर्तनाच्या टप्प्यावर आहे. “आपल्या परंपरा, वारसा, कल्पना, पद्धती आणि सृजनशीलतेला आवाज देणे आवश्यक आहे”, असे ते म्हणाले.

परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की तंत्रज्ञान आणि परंपरा यांनी हातात हात घालून चालले पाहिजे, कारण तंत्रज्ञान आपल्या विशाल वारशाबद्दलची जागरूकता आणि त्याबद्दलच्या जाणीवेची सघनता वाढवू शकते, विशेषतः तरुण पिढ्यांसाठी. “संबंधित कौशल्य विकासाद्वारे तरुण प्रतिभेला सर्जनशील सहकार्याच्या युगासाठी सज्ज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विकसित भारत उभारण्याच्या दृष्टीने झेप घेण्यासाठी नवोन्मेष ही गुरुकिल्ली आहे”, असे त्यांनी अधोरेखित केले.

डॉ. जयशंकर म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उदयोन्मुख युगात शक्यता या कल्पनेच्याही पलीकडे आहेत, तरीही पक्षपात कमी करून, सामग्रीचे लोकशाहीकरण करून तसेच त्याच्या नीतिमत्तेला प्राधान्य देऊन उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर करण्याची आवश्यकता आहे. “जागतिक कार्यस्थळ आणि जागतिक कार्यबलासाठी मानसिकता, चौकट, धोरणे आणि पद्धतींमध्ये बदल आवश्यक आहेत”, अशा शब्दांत त्यांनी जागतिक माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासमोरील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करताना वेव्हजवर विश्वास असल्याचा पुनरुच्चार‌ केला.

आपल्या स्वागतपर भाषणात संवादाचा सूर निश्चित करत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले की संस्कृती सर्जनशीलतेला प्रेरणा देते, जी सीमा ओलांडून लोकांना जोडते. त्यांनी सांगितले की, तंत्रज्ञानामुळे आपल्या कथाकथनाच्या पद्धतीत बदल होत असल्याने सामग्री निर्मिती आणि वापरही वेगाने बदलत आहेत. आपण अशा वळणावर आहोत जिथे आपल्याला स्थानिक सामग्री निर्मितीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.
७७ देशांमधील प्रतिनिधींचे स्वप्ननगरी मुंबईत स्वागत करताना वैष्णव यांनी सहकार्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. सामायिक यशासाठी आपण सर्वांनी सह निर्मिती विषयक करार, संयुक्त निधी आणि घोषणापत्र यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असून त्यामुळे डिजिटल तंत्रज्ञानातील तफावत दूर होईल, बंधुभाव, जागतिक शांतता आणि सौहार्द्र वाढीस लागेल असे ते म्हणाले. अशाप्रकारे आपल्याला सर्जनशीलतेचा वैश्विक सेतू नवकल्पनांच्या महामार्गापर्यंत विस्ताराला पाहिजे, असे वैष्णव यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चासत्रात, मंत्रीस्तरीय वरिष्ठ प्रतिनिधींनी आपली मते मांडली. वेव्हज परिषदेच्या पहिल्या हंगामात क्रिएट इन इंडिया चॅलेंज उपक्रमाअंतर्गत झालेल्या ३२ स्पर्धांमधून जगभरातील ७०० अव्वल आशयकर्ते जगासमोर आले आहेत, अशी माहिती भारताने सहभागी देशांना दिली. तसेच पुढील हंगामापासून हे चॅलेंज २५ जागतिक भाषांमध्ये घेतले जाईल ज्यामुळे जगभरातील विविध भाषांमधील सर्जनशील प्रतिभा ओळखता येईल, यामुळे त्यांना वेव्हजच्या मंचावर त्यांच्या सर्जनशील आशयाचे सादरीकरण करता येईल, असेही भारताने सांगितले.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या इतर मान्यवरांमध्ये भारत सरकारचे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू आणि भारत सरकारचे इतर वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश होता.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’सोबत सामंजस्य करार

Next Post

तरूणीस लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार…वेगवेगळया भागात राहणा-या दोन युवतींचा परिचीतांनी केला विनयभंग

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
rape2

तरूणीस लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार…वेगवेगळया भागात राहणा-या दोन युवतींचा परिचीतांनी केला विनयभंग

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी घरामध्ये वादाचे प्रसंग टाळलेले बरे, जाणून घ्या, गुरुवार, २१ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 20, 2025
IMG 20250820 WA0386

नाशिक जिल्हा परिषद पंचायत विकास निर्देशांकात राज्यात अव्वल…यांच्या हस्ते होणार गौरव

ऑगस्ट 20, 2025
election 1

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या…सहकार विभागाने घेतला हा निर्णय

ऑगस्ट 20, 2025
fda1

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई…मिठाईचा २४ हजाराचा साठा जप्त

ऑगस्ट 20, 2025
प्रातिनिधिक फोटो

कारमधून आलेल्या नागासाधूने संमोहन करुन व्यावसायीकास लुटले, रोकडसह हातातील सोन्याची अंगठी केली लंपास

ऑगस्ट 20, 2025
Sale KV Static blue 1x1 copy 1 e1755691438850

फ्लिपकार्टवर पोको एम७ प्‍लस ५जीच्‍या विक्रीला सुरूवात…ही आहे किंमत

ऑगस्ट 20, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011