अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून बागलाण पट्यात पावसाचा जोर अधिक असल्याने मोसमखोऱ्यासह मालेगाव तालुक्याला वरदान ठरणारे हरणबारी धरण भरण्याच्या मार्गावर आहे ११६६ दशलक्ष क्षमता असलेल्या या धरणात १०९० पाणी साठा झाला असून धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मोसम नदीही दुथडी भरून वाहू लागणार आहे, तर बागलाण मधील दसाने, जाखोड,पठावे ही छोटी धरणे भरून वाहू लागली आहे. दरम्यान बागलाण तालुक्यात अनेक निसर्ग स्थळे डोंगरावरून वाहणारे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.