अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील सुरगाण्यांमध्ये पावसाने हाहाकार घातला असून सुरगाण्या पासून काही अंतरावर असलेला प्रसिद्ध भिवतास धबधबा आता प्रवाहित झाला आहे. जोरदार पावसामुळे धबधब्याने आता रौद्ररूप धारण केले आहे. भिवतास धबधब्याचे खळखळणारे पाणी सुमारे २०० फूट दरीत कोसळत असून ,पर्यटकांचे आकर्षण असलेला हा धबधबा महाराष्ट्र व गुजरात राज्यातील पर्यटकांचे केंद्र असून आता हा धबधबा पर्यटकांना खुणावू लागला आहे.