अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
चांदवड तालुक्यातील चिखलआंबे येथील शेतकरी वसंत आमले यांच्या शेतातील बोरवेल मध्ये अचानक चाळीस फुटापर्यंत पाण्याचे फवारे उडल्याने सध्या हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. पाण्याची पातळी वाढल्याने हा अचानक प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. बोरवेल मध्ये सोडलेली इलेक्ट्रिक मोटर, पीव्हीसी पाईप, केबल या फवाऱ्याने उंच उडाल्याने जिल्हाभर या व्हिडिओची सध्या चर्चा रंगली आहे.