अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्हयाच्या कळवण तालूक्यातील आदिवासी पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्याने चणकापूर आणि पुनंद धरणातून मोठ्या प्रमाणावर काल पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने गिरणा नदीला मोठ्या प्रमाणात पुर आला आहे. देवळा तालूक्यात सर्वदूर पाऊस त्यातच गिरणानदी काठा लगत असलेल्या विठेवाडी, भऊर, सावकी गावांच्या अनेक शेतात पाणी घुसल्याने शेतक-यांनी लावलेला मका, ऊस व अन्य पिकांच क्षेत्र पाण्याखाली गेल्याने शेतक-यांच मोठ नुकसान झाले आहे. महसुल विभागाने नुकसान झालेल्या पिकांच तातडीने पाहणी करुन पंचनामे करावे अशी मागणी नुकसाग्रस्त शेतक-यांनी केली आहे.