नाशिक – पाणीप्रश्नावरून अनेकदा राज्याराज्यात वाद होताना दिसतात. दमणगंगा-पिंजाळ आणि पार-तापी-नर्मदा हे दोन नदीजोड प्रकल्प आणि त्यातून उद्भवलेला महाराष्ट्र-गुजरात या राज्यांमधील पाणीवाटपाचा व वापराचा वाद, या प्रकल्पांसंदर्भात दोन्ही राज्यांमध्ये झालेला करार याविषयी जलतज्ञ इंजि. राजेंद्र जाधव यांच्याशी खास बातचीत. राजेंद्र जाधव यांचा पाणी प्रश्नाचा सखोल अभ्यास आहे. पाणी प्रश्नावर काम करण्यासाठी त्यांनी जलचिंतन या संस्थेची स्थापना केली. पाणीप्रश्न आणि त्यावरील उपाय याविषयी महत्त्वाची माहिती शनिवार दि. ०५ फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा दहा वाजता फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून उलगडणार आहोत.
ही मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://fb.me/e/2cv6LA59F