वाशिम (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात लिंग बदल करून काही जण स्त्री असेल तर पुरुष होतात. आणि पुरुष असेल तर स्त्री होतात. परंतु मूळ स्त्री रूपात असताना केवळ वेशभूषा बदलून एका महिलेने चक्का ३८ वर्ष पुरुष असल्याचे भासविले, परंतु यामागे तिचा कोणालाही फसवण्याचा उद्देश नव्हता. तर सामाजिक कार्यात पुरुष असल्याने आपण चांगले काम करू शकतो, स्त्री रूपात आपल्याला तितकेसे काम करण्याची संधी मिळेल मिळणार नाही, या समज – गैरसमजातून किंवा या भावनेतून विदर्भातील एका तरुणीने चक्क आपण तरुण असल्याचे अनेक वर्ष लपवून ठेवले. अखेर आता तिने ही गोष्ट जाहीरपणे कबूल केले असून यामुळे तिला ओळखणाऱ्या सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वास्तविक तिच्या कुटुंबाला ही गोष्ट माहीत होती. मात्र त्यांचाही यामध्ये काहीही दोष नव्हता असे दिसून येते.
सामाजिक कार्यकर्ता
स्त्रिया आणि पुरुष यांच्या शरीररचनांमध्ये फरक आहे, पण समाजामध्ये स्त्रिया आणि पुरुषांबाबत जे भेदभाव केले जातात, त्या सर्वांचे कारण आपल्याला त्यांच्या शारीरिक फरकांमध्ये सापडेलच असे नाही. लिंग हे शारीरिक आहे तर लिंगभाव समाजात घडवला जातो. स्त्रिया आणि पुरुषांना विशिष्ट प्रकारे वाढवले जाते; यात स्त्रियांनी व पुरुषांनी कसे वागावे हे शिकवले जाते. घरकाम, चूल-मूल ही बाईची जबाबदारी तर घराबाहेरच्या जबाबदाऱ्या पुरुषाच्या मानल्या जातात. मात्र वाशिममधील तरुणीच्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सागर चुंबळकर या नावाने एक स्त्री तथा तरुणी तब्बल ३८ वर्षांपासून पुरुष असल्याचे सांगत समाजात वावरत होती, मात्र तीने पुन्हा एकदा मी मूळ स्त्रीच असल्याचे सांगितले, तेव्हा परिचित असलेल्यांपैकी अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण गेल्या अनेक वर्षांपासून सागर हा नावाने सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरत होता.सागर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्णवेळ स्वयंसेवक आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या अनेक कार्यक्रमांचा खंदा आयोजक अशी त्याची ओळख असून हा हाच तरुण तडफदार खंदा कार्यकर्ता आता मूळ कार्यकर्ती असल्याचे समोर उघड झाले आहे.
बालपणापासून मुलांमध्येच वावर
मूळ मुलगी असलेली संगरा ही बालपणापासून मुली नाही मुलांमध्ये रमत असे, त्यांच्यासोबत मैदानी खेळ खेळणे, मस्ती करणे , असे प्रकार सुरू होते. शाळेत असताना ती मुलगा म्हणूनच वावरली. त्यानंतर सामाजिक कार्यात युवक तथा पुरुष म्हणून तिची ओळख होऊ लागली. साहजिकच मुलगी – तरुणी, स्त्री किंवा महिला म्हणून आपली मूळ ओळख तिने झाकून ठेवली, याचा तिला बाहेर कुठेही त्रास झाला नाही की, अडचण आली नाही. मात्र आपण मुलगी आहोत आणि मुलगा म्हणून वावरतोय हिचा तिला स्वतःला मानसिक त्रास झाला तसेच घरच्यांना देखील ती मुलगी आहे याची जाणीव होती आणि माहीत देखील होते. मात्र वयाच्या आठव्या वर्षी ती संघाच्या संपर्कात आली आणि संघाच्या विचाराने प्रेरित झाली.
या भीतीपोटी
आपण स्त्री म्हणून सांगितले तर आपले सामाजिक काम सुटेल ही भीती तिच्या मनात होती, त्यामुळे तिने स्त्रीत्व स्वीकारले नाहीच आणि पुरुष म्हणून तिने राहणं स्वीकारले, केवळ मुलींना असणारी बंधने टाळण्यासाठी सागरने हा निर्णय घेतला. आपण जन्माने स्त्री आहोत हे सागरने समाजापासून नेहमी लपवून ठेवले होते, सागरचे काळाप्रमाणे शरीरही बदलत होते. घरच्यांनीही तिला मूळ रुपात परतण्याचे सल्ले दिले. पण सागर आपल्या राष्ट्रकार्यात मग्न होता. पण काही महिन्यांपूर्वी सागरचे मन परिवर्तन झाले. त्यानंतरही मित्र व घरच्यांती सागरला या निर्णयासाठी पाठिंबा दिला . तसेच यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याला ‘प्रायश्चित्त यज्ञ ‘ असे म्हटले आणि सागरचे नामकरण केले आता संगरा. संघाच्या विचारधारेतून तिला स्त्री म्हणूनच पुन्हा एकदा काम करण्याचे स्वातंत्र्य मिळाले ते देखील प्रायश्चित यज्ञातून पुढे आले. परंतु तिने किंवा त्याने असे का केले हा प्रश्न मात्र समाजापुढे कायम आहे. आणि याला कारण म्हणजे स्त्री पुरुष भेद हेच उत्तर असावे.
Washim Sagar Gender Change Male Female Sangara