वॉल्ट डिस्ने ही कंपनी स्टार स्पोर्ट्स आणि फॉक्स स्पोर्ट्ससह दक्षिण-पूर्व आशियात यावर्षी १०० चॅनेल बंद करणार आहे. डिस्नेचे मुख्य कार्यकारी बॉब चापेक यांनी मॉर्गनच्या वार्षिक जागतिक तंत्रज्ञान, माध्यम आणि दूरसंचार परिषदेत ही घोषणा केली.
बॉब चापेक म्हणाले की, आम्ही आर्थिक वर्ष २०२० मध्ये ३० दूरचित्रवाहिन्या बंद केल्या. आता आम्ही २०२१ मध्ये १०० चॅनेल्स बंद करण्याची योजना आखली आहे. भारतसह हाँगकाँगमधील अनेक क्रीडा वाहिन्या बंद करण्याच्या निर्णयानंतर डिस्नेने दुसरीकडे जाण्याचे संकेत दिले आहेत.
यावर्षी सप्टेंबरपर्यंत स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २, फॉक्स स्पोर्ट्स, फॉक्स स्पोर्ट्स ३ यासह १८ चॅनेल बंद होतील. चॅपेक यांनी मात्र भारतात डिस्ने वाहिन्या बंद होतील की नाही याबद्दल स्पष्टीकरण दिले नाही. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताबाबत डिस्नेला वेगळ्या दृष्टिकोनाची आवश्यकता असल्याचे चॅपेक यांनी कबूल केले. चॅनेलसाठी भारत खरोखर एक अनोखा आणि असामान्य देश आहे. भारताकडे कमी बॅन्डविड्थ आहे, म्हणून तेथे स्थानिक भाषा विशेषतः महत्त्वपूर्ण आहेत, असेही ते म्हणाले.