इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील सूत्रधार वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली. सकाळी नाश्त्याच्या वेळी बंदी उठवल्याने सर्व कैदी बाहेर मोकळे असतांना ही मारहाणीची घटना घडली.
या घटनेत महादेव गिते आणि अक्षय आठवले हे दोघे वाल्मिक कराड यांच्या अंगवार धावून गेले. तेव्हा बाजुलाच असलेला सुदर्शन घुले वाल्मिक कराडच्या मदतीसाठी धावून आला. मात्र, महादेव गिते आणि अक्षय आठवले या दोघांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केली.
महादेव गिते व अक्षय आठवले यांना वाल्मिक कराडने खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा त्यांना राग होता. त्यामुळे त्यांनी तो काटा आज तुरुंगात काढला.