इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला. त्यानंतर आज बीड जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने ७ दिवसाची एसआयटी कोठडी दिली. त्यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणी वाढल्या आहे.
कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हे कराडशी संबधित आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा काय संबध आहे का? याचा तपास आता केला जाणार आहे. आरोपी कराड यांना समोरासमोर बसवून चोकशी करण्यात येणार आहे.
कराड पुण्यात आयडीसमोर शरण आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करुन कसून चौकशी केली. अगोदर तो तीन आठवड्यांपासून तो फरार होता. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही वाल्मिक कराड यांचे नाव घेतले जात आहे. त्यामुळे या प्रकरणातही त्याची चौकशी केली जाणार आहे.
मी जर दोषी असेल तर मला फाशी द्यावी
शरण येण्याअगोदर वाल्मिक कराड यांनी व्हिडिओ शेअर करत संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबध नसल्याचा दावा केला आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडीसमोर हजर होत आहे. संतोष देशमुख यांच्या मारेक-यांना अटक करावी, फाशी द्यावी राजकीय कारणासाठी माझं नाव घेऊ नये. या प्रकरणात मी जर दोषी असेल तर मला फाशी द्यावी असेही त्याने या व्हिडिओत म्हटले आहे.
हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड
वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचे आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे सीआयडी वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करते का हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.