चालण्याच्या पद्धतीवरून स्वभाव
पंडित दिनेश पंत
आपल्या अनेक सवयींवरून आपल्या स्वभावाचा बऱ्यापैकी अंदाज घेता येतो. फक्त निरीक्षण हवे. चालणे हे त्यापैकीच एक..
– जास्त हात हलवत चालणारी मंडळी बर्यापैकी मुडी असतात. नको तिथे स्पष्ट बोलण्याचा स्वभाव असतो….
– अजिबात हात न हलवता चालणारे स्वतःच्या मतावर ठाम असतात. खूप कमी लोकांशी यांचा स्वभाव जुळतो….
– कुणीतरी सोबत असल्याशिवाय पायी फिरायला न जाणारे महत्त्वाचे निर्णयाबाबत इतरांवर अवलंबून असतात. त्यांना अश्रूही लवकर येतात……
– प्रमाणापेक्षा जास्त फास्ट चालणारे महत्त्वाच्या बाबतीत विसरभोळे असू शकतात. महत्वाची कागदपत्रे बरेचदा सापडत नाहीत…..
– ग्रुपसोबत असल्याशिवाय फिरायला न जाणारे सामाजिक उत्सवात अग्रेसर असतात. प्रसंगी आर्थिक मदत करतात……
– एकटेच पायी पायी फिरून येणारी मंडळी आपले सर्वच पत्ते उघडे करत नाहीत….
– कटाक्षाने डाव्या बाजूने चालणारे सहजासहजी नाती तुटू देत नाहीत. नात्यात कटुता आपल्यापासून येऊ देत नाहीत….
– उजव्या बाजूने चालणारे स्वतःचे मत इतक्या सहज बदलत नाहीत…..
– सापडेल तसा रस्ता शोधणारे कोणतीही सबब न सांगता मदतीला धावतात……
– सतत मागे पाहत चालणारे अति विचार करतात. बरेचदा संधी निघून जाते….
– चालताना सतत बोलणारे मेरी आवाज सुनो असू शकतात…
– रस्त्याने खात चालणारे कुटुंबवत्सल भावनिक मोकळ्या शब्दाचे असतात…
– विशिष्ट प्रकारचा पेहराव व शूज घातल्याशिवाय फिरायला न जाणारे अति व्यवहारी, सुरक्षित गुंतवणूक करणारे असू शकतात…..
– ज्या बाजूने फिरायला गेले त्याच बाजूने परत येणारी मंडळी शक्यतो रूढी-परंपरा मोडत नाहीत. इतरांच्या अनुभवाने बदल करतात….
– चालण्याची गती कमी अधिक करत चालणे अति खर्चिक स्वभावाचे असतो….
– चालताना बोर्ड वाचत चालणारे, परिसराची माहिती ठेवणारे, कायम फॅमिली टूरवर जातात…..
– फिरायला गेल्यावर मित्रांना आठवणीने चहा पाजणारे इतरांच्या आनंदात आनंद शोधतात….
– अजिबात फिरायला न जाणारे, फिरायचा कंटाळा असणारे, मित्रांची बारीकसारीक माहिती ठेवतात. योग्य प्रसंगी पत्ते उघडतात……
आपण देखील निरीक्षण करा व आनंद घ्या