मुंबई – सचिन वाझे यांचे निकटवर्तीय रियाझुद्दीन काझीला कोर्टाने १६ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी दिली आहे. काझीला काल रात्री १२.३० वाजता अटक करण्यात आली होती. अँटिलिया प्रकरणाचा तपासात अनेक धक्कादायक गोष्टी पुढे येत आहे. त्यात आता काझीकडून एनआयए माहिती गोळा करत आहे. या प्रकरणातील काझी हा सुत्रधार असल्याचे एनआएने आज कोर्टात सांगितले.
दरम्यान आज कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान एनआयएने युक्तीवाद करतांना सांगितले की, आम्हाला काही सीसीटीव्ही फुटेज सापडले आहेत. चौकशी दरम्यान सचिन वाझे हे अर्धवट माहिती देत आहे. त्यामुळे अधिक माहितीसाठी मिळवण्यासाठी काझीची चौकशी गरजेची आहे. सीडीआर आणि आयपीडीआर बद्दल काझीकडे चौकशी करावी लागेल. हे प्रकरण केवळ जिलेटिन किंवा मनसुख हिरण हत्या प्रकरणापर्यंत मर्यादित नसल्याचे एनआयएने सांगितले. यासाठी लागणारा पैसा, जिलेटिन कुठून आले याची माहिती सुध्दा मिळवणे महत्त्वाचे आहे. दरम्यान या सुनावणी दरम्यान काझी याच्या वकिलांनी युक्तीवाद करुन कोठडीच्या मागणीला विरोध केला.