शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सुटी मिळूनही मतदान न करणाऱ्यांना बसणार दणका; निवडणूक आयोगाने घेतला हा निर्णय

ऑक्टोबर 25, 2022 | 5:24 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक छायाचित्र

प्रातिनिधीक छायाचित्र


नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्या देशात लोकशाही पद्धती असल्याने दरवर्षी कोणत्या ना कोणत्या निवडणुका होतच असतात, अगदी लोकसभेपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत वेगवेगळ्या निवडणुकीचा हंगाम सुरूच असतो. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी सरकारी तसेच खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी देण्यात येते.

काही ठिकाणी सुट्टी दिवसभर तर काही ठिकाणी अर्धा दिवस किंवा चार ते दोन तास सुट्टी असते. मात्र काही कर्मचारी मतदानाचा हक्क बजावण्याऐवजी त्या दिवशी या सुट्टीचा उपयोग सहलीसाठी किंवा पर्यटन स्थळी जाण्यासाठी उपयोग करतात. म्हणजे एक प्रकारे सुट्टी एन्जॉय करतात. वास्तविक पाहता मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे आद्य कर्तव्य असते मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. परंतु आता यापुढे कोणालाही मतदानाचा हक्क बजावण्यास टाळाटाळ करता येणार नाही.

कारण यासाठी खुद्द निवडणूक आयोगाने एक योजना आखली असून त्यानुसार खासगी कंपन्यातील कंपन्यांबरोबर करार केला आहे त्यामुळे खाजगी कंपन्यातील व्यवस्थापन किंवा प्रशासन विभाग अशा कर्मचाऱ्यांनी मतदानात टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर कारवाई करणार आहे. त्यामुळे प्रत्येकालाच्या पुढे मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मतदानाच्या दिवशीच्या सार्वजनिक सुट्टीचा अन्य कामांसाठी उपयोग करता येणार नाही.

विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने या उपक्रमासाठी हजाराहून अधिक कार्पोरेट कंपन्यांसोबत एक करार केला आहे. त्यानुसार या खासगी कंपन्या मतदानाची सुट्टी घेणाऱ्या आणि मतदान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी खासगी कंपन्या नोडल अधिकारी नियुक्त करणार येणार असून सदर अधिकारी मतदान न करणाऱ्या नोकरदारांवर लक्ष ठेवणार आहे. मतदान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव चक्क कंपनीच्या वेबसाईटवर झळकणार असून नोटीस बोर्डावरही अशा कर्मचाऱ्यांचे नाव लिहिले जाणार आहे. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांची बदनामी होईल, तसेच त्याला त्याच्यावर योग्य ती कारवाई प्रशासनाकडून करण्यात येऊ शकते.

महत्त्वाचे म्हणजे लवकरच गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणारा असून यासंदर्भात लगेचच या उपक्रमाचे अंमलबजावणी होणार आहे, असे सांगण्यात येते. त्यामुळे आयोगाकडून गुजरामध्ये १०० हून अधिक कामगारांना रोजगार देणाऱ्या उद्योगांवर लक्ष देण्यात येणार आहे. या उद्योगांना त्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यास सांगितले आहे. गुजरातचे मुख्य निवडणूक अधिकारी पी. भारती यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Voting Holiday Voters Right Election Commission

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ओप्पोच्या या स्मार्टफोनवर तब्बल २१ हजारांचा डिस्काऊंट; नक्की विचार करा

Next Post

ही कंपनी म्हणते,’आमची कार खरेदी करा, अपघातच होणार नाही!’

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
Mercedes Benz e1666629277931

ही कंपनी म्हणते,'आमची कार खरेदी करा, अपघातच होणार नाही!'

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011