इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – न्यूझीलंड जवळील टोंगा या देशानजिक प्रशांत महासागरात ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे टोंगासह जपान व अन्य नजिकच्या देशात त्सुनामीचे आगमन झाले आहे. तसा इशारा जपानच्या हवामान खात्याने दिला आहे, त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर सुमारे ३ फूट उंचीपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी रशियामध्येही त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे.
सध्या त्सुनामीमुळे टोंगाच्या किनाऱ्यावर प्रचंड उंच लाटा उसळत असून बचावासाठी नागरिक उंच ठिकाणी गेले आहेत. तसेच हवाई, अलास्का आणि यूएस पॅसिफिक किनार्याकडे समुद्राच्या प्रचंड लाटा सरकत आहेत. आता या भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उपग्रह प्रतिमेत प्रशांत महासागराच्या निळ्या पाण्यावर काळी राख, गरम वाफ आणि वायूचा प्रचंड आकार दिसत आहे. नॅशनल वेदर सर्व्हिसने त्सुनामीचा इशारा दिला आहे. आता कॅलिफोर्निया, ओरेगॉन, वॉशिंग्टन, दक्षिणपूर्व आणि दक्षिण अलास्का द्वीपकल्पासह, ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा आणि अलेउटियन बेटे या अमेरिका लगतच्या राज्यांमध्ये सुरक्षा वाढविण्यात आली आहे. या इशाऱ्यानंतर अमेरिकेच्या आपत्ती नियंत्रण विभागाने किनारी भागात संरक्षण व सतर्कतेत वाढ केली आहे. एवढेच नाही तर मदत आणि बचाव पथकासह स्थानिक प्रशासनालाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
https://twitter.com/SBSNews/status/1482513606826946564?s=20
नेटवर्क इंटेलिजेंस कंपनी केंटिकचे कार्यकारी डग माडोरी यांच्या मते, या लाटांमुळे टोंगामध्ये कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही. परंतु याचे मुख्य कारण म्हणजे प्रशांत महासागरात ज्वालामुखीचा उद्रेक होय, यामुळे सदर बेटावरील देशातील दळणवळण सेवा स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ७.४५ वाजता ठप्प झाली. सध्या टोंगामधील इंटरनेट सेवा फक्त फिजीहून सागरी केबलद्वारे उपलब्ध आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नुकसान झाल्याचा संशय व्यक्त होत आहे, टोंगा येथील हुंगा हापाई ज्वालामुखी येथे स्फोट झाला. त्यामुळे अर्धा मीटर उंचीपर्यंतच्या लाटा किनार्याकडे सरकताना दिसत आहेत. यावेळी न्यूझीलंडच्या सैन्याने सांगितले की, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि गरज पडल्यास मदत करण्यास तयार आहोत.