पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – अनेक टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लॅन लॉन्च करत असतात. सहाजिकच सर्व खाजगी टेलिकॉम कंपन्यांमध्ये सध्या स्पर्धा दिसून येत आहे त्यातच वोडाफोन आयडिया कंपनीने बाजी मारलेली दिसून येते. Vodafone-idea कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी काही नवीन योजना आणल्या आहेत. ही योजना खास अशा ग्राहकांसाठी आहे जे परदेशात फिरत असतात. तसेच हा कंपनीचा इंटरनॅशनल अनलिमिटेड रोमिंग पॅक आहे. त्यांची किंमत 599 रुपये ते 5,999 रुपये आहे. या योजनेची अधिक माहिती जाणून घेऊ या..
UAE, UK, USA, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, ऑस्ट्रेलिया, थायलंड, ब्राझील यांसारख्या लोकप्रिय देशांमध्ये प्रवास करणारे Vodafone Idea पोस्टपेड वापरकर्ते या अमर्यादित आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅकची निवड करू शकतात. 599 रुपयांची योजना 24 तास रोमिंग ऑफर करते, 28 दिवसांच्या वैधतेसाठी, 5999 रुपयांचा पॅक निवडावा लागेल.
सर्व व्ही पोस्टपेड रोमिंग पॅकवरील ‘ऑलवेज ऑन’ वैशिष्ट्य हे निश्चित करते की, ग्राहकांनी सदस्यता घेतलेल्या पॅकची मुदत संपल्यानंतरही आंतरराष्ट्रीय रोमिंग दरम्यान जास्त शुल्क आकारले जाणार नाही, असे कंपनीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
उदाहरणार्थ, जर एखाद्या ग्राहकाने 7 दिवसांचे पोस्टपेड रोमिंग घेतले असेल परंतु पॅक संपल्यानंतरही तो परदेशात असेल, तर त्याचे बिल 599 रुपयांच्या पुढे जात नाही तोपर्यंत तो कॉलिंग, एसएमएस आणि डेटा वापरणे सुरू ठेवू शकतो. मात्र 599 रुपयांचे शुल्क ओलांडल्यावर, वापरकर्त्यांना प्रत्येक अतिरिक्त दिवसासाठी 599 रुपये बिल दिले जाईल.