मुंबई – सध्या खासगी टेलिकॉम कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या योजनांबाबत मोठी स्पर्धा सुरू आहे. व्होडाफोन-आयडिया तसेच जिओ आणि एअरटेलने अनेक प्लॅन आणले आहेत, परंतु Vi चे काही प्लॅन हे अन्य कंपन्यांपेक्षा अधिक फायदेशीर आहेत. व्होडाफोन आयडियाने एकाच वेळी ग्राहकांसाठी 4 प्रीपेड प्लॅन आणले असून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यात काही अतिरिक्त फायदे देखील आहेत.
एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया, रिलायन्स जीओने देखील आपल्या अनेक प्लॅनमध्ये किमती वाढवण्याची घोषणा केली. तरी आपल्या काही लोकप्रिय आणि निवडक प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना फारसा खर्च करावा लागणार नाही. कारण व्होडाफोन आयडिया (Vi) ने मोबाईल वापरकर्त्यांची लक्षात घेऊन एकाच वेळी चार प्रीपेड प्लॅन लॉन्च केले आहेत. त्यांची सुरुवातीची किंमत 155 रुपये आहे. हे चार प्रीपेड प्लॅन कंपनीच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर लिस्ट करण्यात आले आहेत. या सर्व यूजर्सना पुरेसा डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. इतकेच नाही तर 666 आणि 669 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये Binge ऑल नाईट, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि लाईव्ह TV आणि Vi मुव्ही चा अॅक्सेस दिला जाईल.
155 रुपयांचा प्लॅन
व्हीआयच्या या प्रीपेड प्लानची वैधता 24 दिवसांची आहे. यामध्ये यूजर्सना एकूण 1 GB डेटा मिळेल. प्लॅन वापरकर्ते कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करू शकतात. याशिवाय प्लॅनमध्ये 300 एसएमएस दिले जातील. तथापि, वापरकर्ते या प्लॅनमध्ये Vi मुव्ही आणि वीकेंड डेटा रोलओव्हर सारख्या सेवा वापरू शकणार नाहीत.
239 रुपयांचा प्लॅन
Vi च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 1 GB डेटा दिला जाईल. यामध्ये यूजर्सना फ्री कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. याशिवाय प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस दिले जातील. त्याची मुदत 24 दिवस आहे.
666 रुपयांचा प्लॅन
या प्रीपेड प्लानची वैधता 77 दिवसांची आहे. यामध्ये दररोज 1.5 GB डेटा आणि 100 SMS मिळतात. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. याशिवाय वापरकर्त्यांना रिचार्ज प्लॅनमध्ये Binge ऑल नाईट, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि Vi मुव्ही चा अॅक्सेस मिळेल.
699 रुपयांचा प्लॅन
हा रिचार्ज पॅक 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये यूजर्सला दररोज 100 एसएमएससह 3 जीबी डेटा मिळेल. वापरकर्ते कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करू शकतील. याशिवाय रिचार्ज प्लॅनमध्ये Binge ऑल नाईट, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि Vi मुव्हीचे सबस्क्रिप्शन मोफत दिले जाईल.