मुंबई – व्होडाफोन-आयडियाने आपल्या युजर्सना पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. कंपनीने आणखी काही प्लॅन कायमस्वरूपी बंद करून टाकले आहेत. काही दिवसांपूर्वीच कंपनीने टेरिफ पॅकच्या किमतीत वाढ करून ग्राहकांना झटका दिला होता. व्होडाफोन युजर्स आता खालील प्लॅनचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
व्होडाफोन-आयडियाने आपले काही प्रीपेड प्लॅन्स कायमस्वरूपी बंद केले आहेत. हे प्लॅन्स डिज्नी+हॉटस्टारची वार्षिक मेंबरशिप देत होते. कंपनीने तीन प्लॅन्सना यादीतून हटविले आहे. कंपनीचे ग्राहक डिज्नी+हॉटस्टारच्या वार्षिक मेंबरशिपसाठी आता फक्त दोन प्रीपेड प्लॅन्स निवडू शकणार आहेत. हे प्लॅन्स हायस्पीड डेली डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि डेली १०० एसएमएस ऑफर देतात.
तीन प्लॅन्स बंद
दूरसंचार कंपनीने ५०१ रुपये प्रीपेड रिचार्जसह ६०१ रुपये आणि ७०१ रुपयांचा रिचार्ज पॅक आपल्या संकेतस्थळावरून हटविला आहे. तसेच डिज्नी+हॉटस्टारच्या सब्सक्रिप्शनची ऑफर देणार्या प्लॅन्सबद्दल सविस्तरपणे सांगितले आहे. ही ऑफर देणारे बहुतांश प्लॅन्स सप्टेंबरमध्ये सादर केले जाणार आहेत.
या दोन प्लॅन्समध्ये सब्सक्रिप्शन
१) व्हीआयच्या संकेतस्थळावर लिस्टेड रिव्हाइज्ड प्लॅननुसार, ग्राहक आता वार्षिक डिज्नी+हॉटस्टार सब्सक्रिप्शनचा लाभ घेण्यासाठी ९०१ रुपये किंवा ३,०९९ चे रिचार्ज प्लॅन निवडू शकतात.
२) जे युजर्स ९०१ रुपयांचा पर्याय निवडतील, त्यांना डेली ३ जीबी हायस्पीड डेटासह ४८ जीबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे. त्याशिवाय अमर्यादित कॉलिंग आणि डेली १०० एसएमएसची सुविधाही मिळणार आहे. ही सुविधेवर पूर्ण ७० दिवसांची व्हॅलिडिटी असेल.
३) जे युजर्स ३,०९९ रुपयांचे प्रीपेड रिचार्जचा पर्याय निवडतील, त्यांना डेली १.५ जीबी हायस्पीड डेटा, अमर्याद व्हॉइस कॉल आणि डेली १०० एसएमएस मिळणार आहेत. ९०१ रुपयांच्या रिचार्जप्रमाणे ३०९९ रुपयांचा पॅकसुद्धा एका वर्षाच्या डिज्नी+हॉटस्टारच्या सब्सक्रिप्शनसोबत मिळतो.
४) वरील प्लॅन्स निवडणारे व्हीआय युजर्सना व्हीआय सिनेमा आणि टीव्ही अॅक्सेस, व्हीआयचा डेटा रोलओव्हर, डेटा डिलाइट आणि बिंग ऑल नाइट ऑफरची सुविधा मिळणार आहे.
जिओ-एअरटेलनेही बंद केले असे प्लॅन्स
डिज्नी+हॉटस्टार प्रीपेड प्लॅन्स बंद करणारी व्हीआय ही पहिली कंपनी नाही. जिओनेसुद्धा वार्षिक सब्सक्रिप्शन देणारे ४९९ रुपये, ६६६ रुपये, ८८८ रुपये आणि २,४९९ रुपयांचे प्रीपेड रिचार्ज पॅक बंद केले आहेत. अशाच प्रकारे एअरटेलने आपले ३९८ रुपये, ४९९ रुपये आणि ५५८ रुपयांचे रिचार्ज पॅक बंद केले आहेत.