नवी दिल्ली – देशातील Vi, Jio, Airtel या सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये ग्राहकांना स्वस्त प्लॅन देण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. जिओ आणि व्होडाफोन आयडियादरम्यान रोजचा अमर्यादित डाटा प्लॅन देण्यावरून जोरदार स्पर्धा निर्माण झाली आहे. जिओने नुकताच डेली अनलिमिटेड डेटा चा २४७ रुपयांचा प्लॅन लाँच केला होता. ते पाहून आता व्होडाफोन आयडियानेसुद्धा २६७ रुपयांचा प्लॅन ऑफर केला आहे. या दोन्ही प्लॅन्सची सुविधा जवळपास एकसारखीच आहे. त्यामुळे कोणता प्लॅन चांगला आहे हे ओळखणे ग्राहकांना कठीण झाले आहे. आज आम्ही तुम्हाला या समस्येवरील उपाय सांगणार आहोत.
व्होडाफोन-आयडियाचा २६७ रुपयांचा प्लॅन
व्होडाफोन-आयडियाचा २६७ रुपयांचा प्लॅन पूर्ण ३० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळतो. हा प्लॅन ग्राहकांना रोजच्या एफयूपी लिमिटच्या डाटाचा वापर करण्याचे स्वातंत्र्य प्रदान करतो. या प्लॅनमध्ये एकूण २५GB डाटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि १०० एसएमएस दररोज मिळणार आहे. त्यासोबतच प्लॅनमध्ये ग्राहकांना व्हीआय मूव्हिज आणि टीव्ही क्लासिकचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे.
रिलायन्स जिओचा २४७ रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओचा हा प्लॅन ३० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह सादर करण्यात आला आहे. ग्राहक रोजच्या एफयूपी नसलेल्या मर्यादेच्या डाटाचा वापर करू शकणार आहेत. जिओच्या २४७ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २५GB डाटा आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह १०० एसएमएस प्रतिदिन मिळणार आहेत. तसेच JioCloud, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioTV चे सब्सक्रिप्शन मिळणार आहे.
जिओ आणि व्हीआयचा कोणता प्लॅन चांगला
जिओ आणि व्हीआय च्या या दोन्ही प्लॅनसोबत मिळणार्या सुविधा एकसमान आहेत. अतिरिक्त लाभ आणि त्यांची किंमत हाच यातील फरक आहे. जिओचा प्लॅन व्हीआयच्या प्लॅनपेक्षा २० रुपयांनी स्वस्त आहे. परंतु कोणत्याही टेलिकॉम कंपनीकडून प्लॅन खरेदी करण्यापूर्वी तुमच्या परिसरात कोणते नेटवर्क चांगले आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे.