मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कमर्चारी कपातीचे सुरू झालेले वारे काही केल्या थांबायला तयार नाहीत. मागील तीन ते चार महिन्यांपासून आयटी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. तेच लोण आता टेलिकॉम इंडस्ट्रिमध्ये आले आहे. या अंतर्गत व्होडाफोन कंपनीने तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांना कायमचा नारळ देत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. अशा परिस्थितीत कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याची गरज भासू लागली आहे. सध्या जगभरात १,०४,००० कर्मचारी आहेत. कंपनीकडून कर्मचाऱ्यांची प्रक्रिया तीन वर्षांत पूर्ण करण्याची योजना आहे. ग्राहक, साधेपणा आणि विकास हे आमचे प्राधान्य आहे. अशा स्थितीत दूरसंचार क्षेत्राच्या शर्यतीत राहण्यासाठी गुंतागुंत दूर करण्याबरोबरच संस्थेचं काम सोपं आणि सुलभ करु. आमच्या ग्राहकांना अपेक्षित दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही संसाधनांचं फेरवाटप करु, जेणेकरुन व्होडाफोन व्यवसायाच्या दृष्टीने पुढे जाईल. या कारणास्तव नोकऱ्या कमी करणे आवश्यक आहे, असे कंपनीचे सीईओ मार्गेरिटा डेला व्हॅले म्हणाले आहेत.
कंपनीची कमाई १.३ टक्के म्हणजेच १४.७ अब्ज युरोवर एवढीच झाली, जी मुळात १५ ते १५.५ अब्ज युरोपेक्षा कमी आहे. त्यामुळे कर्मचारी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा परिणाम भारतावरदेखील होणार आहे. येथील कर्मचाऱ्यांचीही कपात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अॅमेझॉन इंडियाने काढले ५०० कर्मचारी
जगभरात कर्मचारी कपात सुरू असतानाच अॅमेझॉन इंडियाने काढले ५०० कर्मचारी कामावरून काढले आहेत. मनुष्यबळ कमी झाल्याचा सरळ फटका अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस आणि ह्युमन रिसोर्सेस टीमला बसला आहे. अॅमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी मार्चच्या अखेरीस कर्मचारी कपातीची घोषणा केली होती.
याचा परिणाम कंपनीच्या जगभरातील ९ हजार कर्मचाऱ्यांवर झाला आहे. कोची आणि लखनौमध्ये कंपनीचे सेलर ऑनबोर्डिंग फंक्शन बंद करण्यात आले आहे. दरम्यान, मागील वर्षी अॅमेझॉनने भारतातील अन्न, वितरण, अॅडटेक आणि घाऊक वितरणासह अनेक व्यवसाय बंद केले होते, हे येथे उल्लेखनीय.
Vodafone Amazon India Lay Off Employees