इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मीडिया प्लेयर सॉफ्टवेअर व व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हर व्हीएलसी मीडिया प्लेयरवर बंदी घालण्यात आली आहे. अहवालानुसार, व्हीएलसी मीडिया प्लेयर आणि व्हिडिओलॅन प्रकल्पाच्या वेबसाइटवर आयटी कायदा, 2000 अंतर्गत सरकारने बंदी घातली आहे. या बंदीवर कंपनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या प्लॅटफॉर्मवर दोन महिन्यांपूर्वी बंदी घालण्यात आली आहे, असे ट्विट एका ट्विटर युजरने केले आहे.
व्हीएलसीमीडिया प्लेयर आणि त्याची वेबसाईट दोन महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे. या प्रकरणी कंपनी आणि सरकारकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. व्हीएलसी मीडियाची वेबसाईट ओपन केल्यावर आय अॅक्ट अंतर्गत बॅन केल्याचा मेसेज दिसतो.
काही अहवालांनुसार, VLC मीडिया प्लेयरवर देशात बंदी घालण्यात आली आहे कारण त्याचा वापर चीन-समर्थित हॅकिंग ग्रुप Cicada द्वारे सायबर हल्ल्यांसाठी केला गेला होता. काही महिन्यांपूर्वी, सायबर तज्ञांनी सांगितले होते की सिकाडा दीर्घकाळ सायबर हल्ल्यासाठी व्हीएलसी मीडिया प्लेयर वापरत आहे. या हॅकिंग ग्रुपने या मीडिया प्लेयरमध्ये मालवेअर इन्स्टॉल केले होते.
या आधीही मोदी सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात जवळपास 350 चायनीज अॅप्सवर बंदी घातली होती. अलीकडे, बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (BGMI) देखील Google Play Store आणि Apple च्या अॅपवरून अचानक गायब झाले. यानंतर, BGMI स्टोअरमधून गायब झाल्यामुळे गेम खेळाडू नाराज झाले आणि BGMI हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाला. 2020 मध्ये PUBG वर बंदी घातल्यानंतर BGMI ला PUBG चा नवीन अवतार म्हणून लॉन्च करण्यात आला होता.
मीडिया प्लेयर आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हर व्हीएलसी मीडिया प्लेयरवर देशात बंदी घालण्यात आली आहे. वृत्तानुसार, VLC मीडिया प्लेयर आणि VideoLAN प्रकल्पाच्या वेबसाइटवर आयटी कायदा, 2000 अंतर्गत सरकारने बंदी घातली आहे. VLC मीडिया प्लेयर आणि त्याची वेबसाईट दोन महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आली आहे. कंपनीकडून याबाबत कोणतेही वक्तव्य आलेले नाही. परंतु, त्याची वेबसाइट डाउन आहे आणि डाउनलोड लिंक देखील ब्लॉक करण्यात आली आहे. व्हीएलसी मीडियाची वेबसाईट ओपन केल्यावर आय अॅक्ट अंतर्गत बॅन केल्याचा मेसेज दिसतो.
विशेष म्हणजे युजर्सचा डेटा चीनला पाठवला जात होता. आता भारतात कोणीही VLC ऍक्सेस करू शकत नाही. VLC Media Player ACT Fibernet, Vodafone-Idea आणि इतर सर्व प्रमुख ISP वर ब्लॉक केले आहे. सरकारने टिकटॉक, कॅमस्कॅनर आणि इतर अनेक लोकप्रिय अॅप्ससह शेकडो चिनी अॅप्स देखील ब्लॉक केले आहेत. अॅप्स ब्लॉक करण्यामागचे कारण म्हणजे हे प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांचा डेटा चीनला पाठवत असल्याची माहिती सरकारला मिळाली होती.
VLC Media Player Ban in India BGMI