इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तरुणाईमध्ये अत्याधुनिक स्मार्टफोनची मोठी क्रेझ आहे. त्यामुळे विवो कंपनीने एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सर्व नवीन तंत्रज्ञानाचा हा Vivo Y75 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज पर्यायात येतो. फोनमध्ये 4 GB व्हर्चुअल रॅम सपोर्ट देण्यात आला आहे.
हा फोन स्टारलाईट ब्लॅक आणि ग्रोइंग गॅलेक्सी या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो. हा फोन MediaTek Dimensity 700 chipset ला सपोर्ट करण्यात आला आहे. तसेच फोटोग्राफीसाठी 50MP रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Vivo Y75 5G स्मार्टफोन 27 जानेवारीपासून म्हणजेच कालपासून Vivo India ई-स्टोअरसह सर्व रिटेल भागीदार स्टोअरमधून खरेदी करण्यात येत आहे. या फोनची किंमत 21,990 रुपये आहे.
Vivo Y75 5G स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा फुल एचडी प्लस इन-सेल डिस्प्ले आहे. सदर फोन 7nm आधारित 5G चिपसेट सपोर्टसह देण्यात येतो. फोनमध्ये ऑक्टा-कोर-1 डायमेंशन 700 चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन Android 12 आधारित Funtouch OS 12 वर काम करेल. या फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Vivo Y75 5G स्मार्टफोन 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर करण्यात आला आहे.
Vivo Y21A स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. त्याचा प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सल्सचा असेल. याशिवाय 2MP सुपर मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. 2-मेगापिक्सलचा आय-फोकस कॅमेरा देखील आहे. हा फोन पोर्ट्रेट मोड, सुपर एचडीआर आणि सुपर नाईट मोडसह देण्यात येतो. फोनच्या समोर 16MP एक्स्ट्रीम सुपर नाईट सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोन पोर्ट्रेट मोड, सुपर एचडीआर आणि सुपर नाईट मोडसह येतो. या फोनच्या फ्रंटमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Vivo Y75 स्मार्टफोन 8mm जाडी आणि 2.5D फ्लॅट फ्रेममध्ये येईल. तसेच फोनचे वजन 182 ग्रॅम असून मल्टी टर्बो 5.0 वर्धित डेटा कनेक्शनसह येईल.