इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत विशेषत : आकर्षक रंगातील स्मार्टफोन घेण्याकडे तरुणाईचा केक्री तरुणाईची क्रेझ दिसून येते त्यातच आता विवो कंपनीचा Vivo Y33T स्मार्टफोनचा नवीन स्टाररी गोल्ड कलर व्हेरिएंट भारतात लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन भारतात 18,990 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन Vivo India e-store, Amazon, Flipkart, Paytm आणि सर्व रिटेल स्टोअरमधून खरेदी केला जाऊ शकतो. Vivo Y33T स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेल कॅमेरा आणि सर्व-नवीन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट सपोर्ट आहे. Vivo Y33T स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोन अल्ट्रा स्लिम डिझाइनमध्ये येतो. त्याची जाडी 8 मिमी आहे.
Vivo Y33T स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे. त्याची स्क्रीन रिझोल्यूशन 2408 पिक्सेल आहे. फोन इन-सेल डिस्प्ले सपोर्टसह येतो. Y33T मध्ये साइड पॉवर बटण आहे. तो फेस अनलॉक फीचर सपोर्टसह देण्यात येतो. या फोनचा स्क्रीन रिफ्रेश दर 90Hz आहे. हा एक गेमिंग स्मार्टफोन आहे, जो अल्ट्रा गेम मोड, लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजीसह येतो. Vivo Y33T स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. फोनच्या फ्रंटमध्ये 16-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.
Vivo Y33T स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 680 चिपसेट वापरण्यात आला आहे. हा फोन Android 12 आधारित FunTouch OS वर काम करतो. Vivo Y33T स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. Vivo Y33T स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंग VEG (vivo Energy Guardian) तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. फोनमध्ये Vivo Multi-Turbo 5.0 चा वापर करण्यात आला आहे.