पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – Vivo कंपनीचा नवीन स्मार्टफोन Vivo- V23e 5G स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. हा फोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी मॉडेलमध्ये उपलब्ध झाला आहे. फोनची किंमत 28,990 रुपये असून तो दोन रंगात ग्राहकांना घेता येईल. Vivo- V23e स्मार्टफोन 6.4 इंच फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. स्क्रीन रिझोल्यूशन 2400 x 1080 पिक्सेल आहे. फोन MediaTek Dimension 810 प्रोसेसर सपोर्ट सह सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये 8 GB रॅम सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच 128 GB स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे. मेमरी कार्डच्या मदतीने फोनची जागा 1 टीबीपर्यंत वाढवता येते. फोनच्या फ्रंटला इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सपोर्ट देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर 44MP आय ऑटो-फोकस सेल्फी कॅमेरा आहे. फोन वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले सपोर्ट देण्यात आला आहे.
https://twitter.com/imVkohli/status/1495980795978301443?s=20&t=4HrRVsWEpG_ffB7qwcI_YQ
Vivo V23e स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेल सेन्सर सपोर्टसह येईल. तसेच 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. याशिवाय 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ड्युअल सिम, 5जी, वाय-फाय, ब्लूटूथ v5.1, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि जीपीएस सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन Android 11 वर आधारित असेल. Vivo V23e 5G स्मार्टफोन सध्याच्या Vivo V23 लाइनअपपेक्षा कमी किमतीत सादर केला जाऊ शकतो. हा फोन 29,990 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध होईल. तसेच Vivo V23 Pro दोन प्रकारांमध्ये देण्यातयेतो. त्याच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 38,990 रुपये असेल. तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 43,990 रुपयांमध्ये देण्यात येतो.