पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चीनी स्मार्टफोन कंपनी असलेली विवोने नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा हा फोन असून विवो टी1एक्स (vivo t1x) असे या मॉडेलचे नाव आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टद्वारे विकत घेता येणार आहे. विवो टी1एक्स या स्मार्टफोनमध्ये ९० Hz रिफ्रेश रेटसह वॉटरड्रॉप स्टाईल नॉच डिसप्ले देण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
फोनमध्ये यूजर ८ GB पर्यंत रॅम वाढवू शकणार असून यासह अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होणार असून तो २७ जुलैपासून फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. स्मार्टफोनच्या व्हेरिएंटनुसार, त्याची किंमत बदलणार आहे. कंपनी बऱ्याच दिवसांपासून हा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत होती. शाओमी आणि सॅमसंगसारख्या ब्रँडला स्पर्धा देण्याचा विचार विवो कंपनी करत आहे.
आज दुपारी १२ वाजता फ्लिपकार्ट ई -कॉमर्स साइटद्वारे सादर करण्यात येत आहे. आज Xiaomi चा Redmi K50i देखील लॉन्च होईल. कंपनीचा हा कार्यक्रम तुम्ही Vivo India च्या सोशल मीडिया चॅनेल आणि YouTube च्या माध्यमातून थेट पाहता येणार आहे. Vivo T1x च्या किंमतीबद्दल माहिती लॉन्च झाल्यानंतरच उपलब्ध होईल परंतु, सध्या आलेल्या माहितीनुसार Vivo T1x ११ हजार ९९९ रुपयांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. ही किंमत त्याच्या ४ GB रॅम आणि ६४ GB इनबिल्ट स्टोरेजसाठी असू शकते.
Vivo T1x च्या सर्व फीचर्सची माहिती अजून पूर्णपणे देण्यात आलेली नाही. हा फोन इतर देशांमध्येही अद्याप लाँच झालेला नाही. मात्र सेलिंग पॉईंटमध्ये, कंपनी प्रथमच कुलिंग सिस्टमसाठी चार थर देत असल्याचे समोर आले आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon ६८० प्रोसेसर दिला जाईल. याशिवाय यात ५० मेगापिक्सलचा सुपर नाईट कॅमेरा दिला जाईल. याबद्दल फारसे शेअर केलेले नाही. या फोनमध्ये आपल्याला ९० Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले पाहायला मिळेल. याशिवाय यामध्ये ५००० mAh ची बॅटरी दिली जाणार आहे.
Vivo T1X smartphone launch features price and details