मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या मोबाईलचे महत्त्व खूपच वाढल्याने वेगवेगळ्या कंपनीचे नवनवीन आणि अत्याधुनिक मोबाईल फोन बाजारात येत आहेत. विशेषतः आकर्षक आणि माफक किमतीत असलेल्या स्मार्टफोनची क्रेझ व विक्री वाढली आहे. त्यातच आता विवोचा नवीन स्मार्टफोन Vivo Y33s 5G चीनमध्ये लॉन्च झाला आहे. याआधी Vivo Y33 4G स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. भारतीय ग्राहक Vivo Y33 5G लाँच होण्याची वाट पाहत असले तरी. हा फोन चीनमध्ये 5000mAh बॅटरी तसेच 8 GB रॅम सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. तसेच प्रोसेसर सपोर्ट म्हणून Mediatek Dimensity 700 चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे.
Vivo Y33s स्मार्टफोनमध्ये 6.51 इंच LCD डिस्प्ले आहे. हा फोन वॉटर ड्रॉप नॉच स्टाइल डिस्प्लेमध्ये देण्यात येईल. तसेच सेल्फीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच फोनच्या मागील कॅमेरा सेटअपमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात प्राइमरी कॅमेराला 13 मेगापिक्सेल लेन्स देण्यात आली आहे. याशिवाय 2 मेगापिक्सलची लेन्स देण्यात आली आहे. Vivo Y33s स्मार्टफोन Android 12 आधारित Origin OS Ocean वर काम करेल. फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सपोर्टसह देण्यात येतो. फोनला बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन आणि 5000mAh बॅटरी सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये USB-C प्रकारचा चार्जिंग पोर्ट तसेच 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
सदर स्मार्टफोन तीन मेमरी पर्यायांसह सादर करण्यात आला आहे. यात 128 जीबी स्टोरेजसह 4 जीबी रॅम, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज सुविधा आहे. याशिवाय 1 टीबी सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनची किंमत ग्राहकांना परवडणारी आहे. तसेच Vivo Y33s स्मार्टफोन तीन रंगात येईल. चीनमधील Vivo च्या अधिकृत वेबसाइटवरून फोनची प्री-बुकिंग सुरू झाली आहे. फोनच्या बेस व्हेरिएंट 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,299 युआन म्हणजे 15,592 रुपये आहे. फोनमध्ये 2 GB एक्स्ट्रा रॅमचा पर्याय देण्यात आला आहे. Vivo Y33s स्मार्टफोनच्या टॉप 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,599 युआन म्हणजे रुपये 18,187 रूपये आहे.