इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर प्रदेश मधील रामपुर जिल्ह्यातील एका गावात एका विवाहित महिलेने गावातील पंचायत समोर एक प्रस्ताव ठेवला. त्यात तीने १५ दिवस पती व १५ दिवस प्रियकराबरोबर राहण्याची अट टाकली. पत्नीचा हा प्रस्ताव बघून नव-याने हात जोडत प्रियकराबरोबरच रहा असे सांगून तीचा अखेर नाद सोडला.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, दीड वर्षापूर्वी अजीम नगर येथे राहणा-या या महिलेचं लग्न शेजारच्याच गावातील एका तरुणाशी झाले. त्यानंतर दोघांमध्ये काही काळ संसार चांगला सुरु असतांना ही विवाहित महिला एका तरुणांच्या प्रेमात पडली. हा तरुण टांडा क्षेत्रातील होता. या प्रियकराबरोर तिचे नातं फुलत गेले. त्यानंतर ती वर्षभरापूर्वी प्रियकराबरोबर पळून गेली.
पतीला ही घटना कळाल्यानंतर त्याने पत्नीला परत आणण्याचे प्रयत्न सुरु केले. गावातील पंचायतच्या मदतीने या प्रयत्नाला यशही आले. पत्नीला परत आणण्यात आल्यानंतर गावातील पंचायतने या महिलेला पतीच्या घरी पुन्हा पाठवले. त्यानंतर पुन्हा असे काही घडणार नाही असाचा सर्वांचा समज होता. पण, प्रियकरांबरोबरचे प्रेमप्रकरण काही थांबले नाही.
त्यानंतर वर्षभरात ही विवाहित महिला नऊ वेळा पळून गेली. त्यानंतरही कधी पोलिसांच्या तर कधी पंचायतच्या मदतीन तीला पतीने पुन्हा घरी आणले. पण, आता दहाव्या वेळी ती पळून गेल्यानंतर पतीने थेट प्रियकराचे घर गाठले. येथे पंचायत बसली व तेथे या पत्नीने १५ दिवस पती व १५ दिवस प्रियकराबरोबर राहण्याचा प्रस्ताव दिला. पण, पतीने हा प्रस्ताव नाकारत प्रियकराबरोबरच रहा असे सांगत हात जोडले.