इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अमेरिकन व्यापार प्रतिनिधी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या चमूने १६ सप्टेंबर २०२५ रोजी भारताला दिलेल्या भेटीदरम्यान, व्यापार कराराच्या विविध पैलूंवर सकारात्मक चर्चा झाली आणि या संदर्भात प्रयत्न तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या चर्चांना पुढे नेण्यासाठी, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ २२ सप्टेंबर २०२५ रोजी अमेरिकेशी चर्चा करण्यासाठी अमेरिकेला भेट देणार आहे. परस्पर फायदेशीर व्यापार करारावर लवकर निष्कर्ष काढण्याच्या उद्देशाने हे शिष्टमंडळ चर्चा पुढे नेण्याची योजना आखत आहे.
H-1B व्हिसाच्या शुल्कात मोठी वाढ
दरम्यान अमेरिकेने H-1B व्हिसाच्या शुल्कात मोठी वाढ केली आहे. हे शुक्ल तब्बल ८८ लाखांपर्यंत वाढवण्यात आले आहे. भारतीय व्यक्तीला अमेरिकेत जाऊन नोकरी करायची असेल तर H-1B व्हिसा मिळावा यासाठी अगोदर त्या व्यक्तीला तब्बल ८८ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. अन्य देशांसाठीदेखील ही शुल्कवाढ लागू आहे.