नाशिक – नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन, नाशिकच्या अध्यक्षपदी विश्वास को-ऑप.बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. सदर बैठकीत कार्याध्यक्षपदी देवळा मर्चंट्स को-ऑप.बँकेचे संचालक राजेंद्र नामदेवराव सुर्यवंशी यांची तर उपाध्यक्षपदी सरस्वती को-ऑप.बँक ओझरचे संचालक दत्तात्रय निवृत्ती गडाख यांची निवड करण्यात आली. ही नेमणूक श्रीमती मनिषा खैरनार अध्यासी अधिकारी तथा सहायक निबंधक (१) अधिन-जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बँक असोसिएशनच्या कार्यालयात ही निवड करण्यात आली.
यापूर्वी विश्वास ठाकूर यांनी सहकार क्षेत्रातील विविध समित्यांवर यशस्वीपणे काम केले असून, सहकारातील आधुनिक बदलांसाठी, सुधारणांसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. सहकारातील विविध प्रश्नांची सोडवणूक करून विकास घडविण्यासाठी ते कार्यरत आहेत.
ठाकूर यांच्या या नियुक्तीबद्दल सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, शिक्षण, क्रिडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
याप्रसंगी नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे संचालक अजय ब्रह्मेचा, नानासाहेब सोनवणे, संजय वडनेरे, अशोक व्यवहारे, अशोक झंवर, यशवंत अमृतकर, भरत पोफळे, डॉ.शशीताई अहिरे, वसंतराव खैरनार, मिर्झा सलीम बेग, रविंद्र गोठी, अलीमुद्दीन वाहिद, व्यवस्थापक रामलाल सानप आदी उपस्थित होते.