श्रीविष्णु पुराण अंश-५
(कृष्णकथा भाग-२)
श्रीकृष्णाच्या बाललीला
पूतना राक्षसिणीचा वध आणि कालियामर्दन!
वैदिक साहित्यात म्हणजेच वेद आणि पुराणात दोन चरित्रे लोकप्रिय आणि विश्व प्रसिद्ध आहेत. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची! श्रीविष्णु पुराणात रामायणाचा कथासार आपण थोडक्यात पहिला. श्रीविष्णु पुराणातील संपूर्ण ५ वा अंश श्रीकृष्ण चरित्राला वाहिला आहे. आज आपण श्रीविष्णु पुराणातील श्रीकृष्ण चरित्र भाग -२ पाहणार आहोत.
कैदेतून सुटका झाल्यावर बसुदेव व देवकी आधी जिथे मथुरेत नंदाचा मुक्काम होता तिथे जाऊन नंदाला भेटले. उतारवयात का असेना पण मुलगा झाला म्हणून त्याचे अभिनंदन केले; मग वसुदेव म्हणाला की, “तुम्ही ज्यासाठी इथे आला आहात तो राजाचा कर जर भरला असेल तर फार काळ इथे न थांबता घरी गोकुळात परत जा. तिथे माझी पत्नी रोहिणी व मुलगा यांचीही काळजी घ्या.”
पूतना राक्षसिणीचा वध
तेव्हा नंद व इतर लोक गोकुळाकडे निघून गेले. त्या काळात पूतना नावाची एक राक्षसीण रात्रीच्या वेळी तान्ह्या बाळांना स्तनपानाद्वारे व दूध देऊन मारीत असे. तिने एकदा तोच प्रयोग कृष्णावर सुद्धा केला पण त्याचा परिणाम मात्र विपरीत झाला.
कृष्णाने तिचे स्तन दोन्ही हातांनी घट्ट धरले व तो ते चावू लागला. हळूहळू स्तनांवरील विषारी दूध संपून रक्त निघू लागले तरीही न थांबता जेव्हा तिचा जीव गेला तेव्हाच कृष्ण थांबला. तीअवाढव्य पूतना जिवाच्या आकांताने ओरडून मरून पडली. ती किंचाळी ऐकून लोक धावत आले व ते दृश्य पाहून थक्क झाले. कृष्ण तिथेच खेळत होता.
यशोदेने चटकन पुढे होऊन त्याला उचलून घेतला. त्याची दृष्ट काढली. गाईच्या शेपटीने त्याची पुन्हा दृष्ट काढली. नंदाने गोमय भस्म घेतले व पुढीलप्रमाणे देवाची प्रार्थना करून ते कृष्णाच्या कपाळी लावले.
‘“संपूर्ण विश्वाचे आदिकारण श्रीहरि तुला राखो. वराहरूप, नरसिंहरूप वामनरूप घेऊन भक्तांचे रक्षण करणारा विष्णू तुझे रक्षण करो. मस्तक गोविंदाने, कंठ केशवाने, गुप्तेंद्रिये व जठर विष्णूने, मांड्या व पावले जनार्दनाने, मुख, हात व पोटऱ्या, मन आणि पूर्ण देह नारायणाने रक्षणा करावा. भूत-प्रेत, राक्षस वगैरे विष्णूच्या शंखध्वनीने नाश पावोत. चारी दिशांनी वैकुंठ राखो. उपदिशांकडून मधुसूदन वरून हृषीकेश आणि तळातून शेष राखो. “
नंतर त्याने एका गाड्याच्या खाली अंथरुणावर कृष्णाला झोपवला.
बालकृष्णाच्या आणखी लीला!
शकटासुर वध!
एकदा असाच भांडयांनी भरलेल्या कृष्णाला झोपवा होता. तो जागा होऊन मुकेमुळे रहत हातपाय आपटू लागला. त्यावेळी त्याची लाभ लागताच तो गाडा उलटागुलटा झाला आणि त्यातली भांडी सर्वदूर गडगडत गेली. तेव्हा मोठा कोलाहल माजला. आवाज ऐकून नंद यशोदेसह गवळी व गौळणी धावत तिथे आले. तिथे पाहतात तर गाडा मोडून पडलेला असून कृष्ण मात्र उताणा पडून खेळतो आहे.
नंदाने चौकशी करता तिथे खेळणारी मुले म्हणाली की, आमच्या देखत या कृष्णाची लाथ बसली व गाडा मोडून पडला; मग नंदाने त्याला उचलून घेतला आणि घरी गेला.
पुढे एकदा मुलांच्या बारशासाठी वसुदेवाने गर्गमुनींना पाठवले, त्यांनी यथायोग्य संस्कार करून मोठयाचे ‘राम’ व धाकट्याचे ‘कृष्णा’ अशी नावे ठेवली. दोघेही दिसामासांनी बाढू लागले. उपडे पडून रांगू लागले आणि त्यांना खेळण्यासाठी घर, आंगण, गोठा पुरेनासा झाला. त्यांना आवरता आवरता त्यांच्या आयांची दमछाक होत असे,
ते दोघेही अत्यंत अवखळ होते. एकदा तर त्या दोघांच्या खोड्यांना कंटाळून जेरीस आल्याकारणाने यशोदेने कृष्णाच्या कंबरेला एका दोरीने बांधून ती दोरी एका भल्या मोठ्या उखळाला बांधली व कृष्णाला म्हणाली की, आता जायचे तिकडे जा. त्यानंतर ती निश्चित होऊन घरात निघून गेली.
इकडे कृष्णाने ते उखळ खेचीत अंगणाबाहेर नेले आणि दोन मोठे अर्जुनवृक्ष जवळ जवळ होते त्यांच्यामधून पलीकडे गेला पण ते उखळ मात्र अडकले. तेव्हा कृष्णाने जरा जोर लावून ओढताच ते दोन्ही वृक्षकडकडाट करीत मुळातून मोडून पडले. तो आवाज ऐकून सगळे धावत आले व बघतात तर ते दोघेही दात काढून हसत होते.
कमरेला दोरीने बांधले होते म्हणून कृष्णाला ‘दामोदर’ असेही म्हणतात.
त्यानंतर नंद व इतर गवळ्यांनी एकत्र जमून विचार केला की, या ठिकाणी विध्ने पुष्कळ निर्माण होऊ लागली आहेत. उदा, पुतनेची पीटा गाडा मोडून पडणे, आपोआप वृक्ष उन्मळून पढ़णे वगैरे, तरी आपण अन्यसुरक्षित जागी जाऊन रहावे; मग ते सर्वजण गोकुळ सोडून यमुनव्याच काठी वृंदावनात जाऊन राहिले.
तिथे राम, कृष्ण व इतर गोपबालक अत्यंत रमून गेले. पुढे लवकरच पावसाळा आला. सर्वत्र पाणीच पाणी झाले, यमुना, ओहोळ वगैरभरून बाहू लागले. जिकडे पहावे तिकडे नुसती हिरव्या रंगाची उधळण होती. काळेभोर ढग दाटून येत व दिवसा अंधारून येई. मधूनमधून मोरांचा केकारव कानावर पडे.
कृष्णासहित सर्व मुलांना तर खेळण्यासाठी रान मोकळेच होते. लपाछपी, सूरपारंब्या आणि विटीदांडू असे त्यांचे खेळ दिवसभर चालू असत; मग दिवसभर खेळून दमलेले ते सगळे बाळगोपाळ सायंकाळी घरी येत असत. असा सर्व लोकांचा काळ मोठ्या आनंदात चालला असताना एके दिवशी कृष्णाने वेगळाच पराक्रम केला.
कालियामर्दन
यमुनेच्या विशाल पात्रात एक मोठा डोह होता. त्याच्या तळाशी कालिया नावाचा महाविषारी नाग आपले कुटुंब आणि परिवारासह रहात असे. त्याच्या विषारी फूत्कारांनी त्या डोहाच्या आजूबाजूचे पाणी विषारी बनले होते. त्या जहाल विषामुळे पाण्यात जलचर प्राणी तर नव्हतेच परंतु किनाऱ्यावरचे गवत व झाडेसुद्धा जळून गेली होती. जनावरे तर तिकडे फिरकत नसत परंतु वरून आकाशातून जाणारा पक्षीही मरून पडत असे.
एकदा कृष्ण एकटाच फिरत फिरत तिकडे गेला असताना त्याने विचार केला की, हा सर्व परिसरच त्या दुष्ट कालियाने विषारी करून सोडला आहे. अशावेळी आमच्या बायका-पुरुषांनी व जनावरांनी जावे तरी कुठे? मुलांनी खेळावे कुठे?
ते काही नाही. या नागाचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल. नाहीतर मी इथे असून काय उपयोग? आमची गुरे आणि माणसे निर्भय झालीच पाहिजेत. या कालियाची दूर कुठेतरी रवानगी करावी लागेल.
असा निश्चय करून तो एका मोठ्या कदंबाच्या वृक्षावर झपाझप चढून गेला आणि त्या वृक्षाच्या शेंड्यावरून त्याने त्या डोहात सूर मारला. त्या वेळी नदीचे पाणी एवढ्या जोरात उसळले की, किनाऱ्यापासून दूर अंतरावर असलेले वृक्षसुद्धा ओलेचिंब झाले. त्या विषारी पाण्यामुळे ते वृक्ष व त्यांच्यावरचे पक्षीही जळून गेले.
कृष्णाने पाण्यावर तरंगत असताना जोरात दंड थोपटले. तो आवाज कानावर पडताच डोहाच्या तळातून कालिया उसळी मारून वर आला. त्याचे डोळे लालभडक असून मुखांतून आगीचे लोळ बाहेर पडत होते. इतर अनेक वायुआहारी सर्प त्याला घेरून होते. त्याच्या अंगावर बहुमोल अलंकार असून त्याच्या अनेक स्त्रियाही सोबत होत्या.
त्याने कृष्णावर एकदा दृष्टी टाकली आणि अति चपळतेने त्याला विळखे घालून दंश करायला आरंभ केला. ते दृश्य दुरूनच पाहून गवळी आणि त्यांची मुले व्रजभूमीकडे धावत गेले व मोठमोठ्याने रडत सुटले. त्यांनी सर्व हकीकत तिथे सांगितली तेव्हा सगळे स्त्री-पुरुष हातातली कामे टाकून डोहापाशी गेले.
तिथले दृश्य पहाताच कितीतरी लोक बेशुद्ध पडले. कित्येकांना रडू फुटले. अनेक गवळणी डोहात उडी टाकावी म्हणून पुढे सरसावल्या.कृष्णावर गुदरलेला प्रसंग पाहून त्यांच्यात मोठा हलकल्लोळ माजला. नंद, यशोदा व रोहिणीसह सगळा राजपरिवार हतबद्ध होऊन स्तब्ध उभा राहिला.
तेव्हा बलराम पुढे गेला आणि कृष्णाला बोलला
“अरे देवाधिदेवा! तू कोण आहेस आणि हे सामान्य माणसाने काय चालवले आहेस? अरे तू या विश्वाचा आदिपुरुष आणि बोल्यांचे ध्यान आहेस. आपले मूळ स्थान सोडून पृथ्वीवर मानवदेह घेऊन पृथ्वीचा भार उतरायचा आहे ना? मीसुद्धा तुझा एक अंश आहे.
या गवळणी देवस्त्रिया असून मानवाच्या रूपात जन्मल्या आहेत. आता तुझा खेळ थांबव आणि सर्वांना चिंतामुक्त कर बघू।”
बलरामाचे बोल ऐकून कृष्णाने हास्य केले आणि तो एकदम उंच उडी मारून व सापाची फणा पकडून तिच्यावर उभा राहिला आणि थयथया नाचत सुटला. कालियाच्या सर्वच फणांवर तो उड्या घेत चालला,
त्याच्या वजनाने आणि नाचण्याच्या प्रचंड बेगाने तो साप कासावीस झाला. त्याचे प्राण कंठाशी आले. तो शेकडो मुखांतून रक्त ओकू लागला.
अशी त्याची अवस्था बघून त्याच्या पत्नी पुढे सरसावल्या आणि हात जोडून म्हणाल्या
“हे देवाधिदेवा! आम्ही आता ओळखले आहे की, जो मूळ तेजोनिधी तोच तू आहेस. देवसुद्धा तुझा महिमा जाणत नाहीत मग आम्हांस कसे कळणार? जे जे काही विश्वात भरले आहे ते सर्व तुझाच अंश आहे. तुझी स्तुती कोणत्या शब्दात करावी?
तू योग्यांनाही अगम्य असून परमाणूहून सूक्ष्म आणि ब्रह्मांडापेक्षा विशाल आहेस, तू अजन्मा, अनंत आणि नित्य आहेस. आम्ही तुला नमस्कार करतो. तुला खरे तर मनापासून कालियाबद्दल द्वेष नाहीच पण लोककल्याणाचा हेतू असल्यामुळे आमचे म्हणणे देखील ऐक!
शरणागताला क्षमा करणे हा थोरांचा स्वभावच आहे. सर्व विशाचा आधार असा तू कुठे आणि हा सामान्य सर्प कुठे? तुझ्या नाचण्याने आता तो मरून जाईल, तेव्हा आता दया कर आणि याला जीवदान देऊन आम्हांला सौभाग्याची भिक्षा दे. या बिचार्यावर राग धरू नकोस.
आम्ही तुजला पुन्हा पुन्हा विनवतो की, कृपा कर आणि आम्हाला पतिदान दे! पतिदान दे!! पतिदान दे!!!”
आपल्या स्त्रियांनी केलेली विनंती ऐकल्यावर तो कालिया सगळी शक्ती एकवटून म्हणाला
“देवा! तूच ईश्वर आहेस. तुझे गुण मी कसा बरे गाऊ शकेन? तू विश्वात्मक आहेस, त्याच्याही पर आहेस. तूच परात्पर आहेस. देव, देवता, यक्ष, राक्षस, बसू, आदित्य, ब्रह्मा व रुद्र यांच्यासहित ही केवळ एक सृष्टी तू स्वतःमधूनच उत्पन्न केली आहेस. ही तर तुझा सूक्ष्म अंश आहे.
विश्वाला व्यापणाऱ्या तुझी निराकाराची पूजा तरी कशी करता येईल? म्हणून ब्रह्मदेवासह थोर थोर महात्मे तुझ्या अवतारांची पूजा करीत असतात. योगी ध्यानाच्या द्वारे तुझी पूजा करतात. अशा स्थितीत मी एक दुर्बळ जीव तुझी पूजा कशी करू शकेन? तेव्हा या स्तुतीने तू मजवर प्रसन्न हो!
क्रोध व क्रौर्य हा माझा नैसर्गिक स्वभाव आहे आणि ती तुझीच देणगी आहे. मी जो बागतो तोही तुझ्याच इच्छेने बागतो. आता अशा परिस्थितीत माझे आता काय करावयाचे ते तूच ठरव, फक्त मला मारू नकोस.”
त्यावर कृष्ण म्हणाला – “अरे! आता तू इथे राहू नकोस. तू सर्व परिवार घेऊन महासागरात जा. माझी पावले तुझ्या माथ्यावर उमटली असल्यामुळे तुला गरुडापासून कसलीच भीती नाही.”
असे ऐकल्यावर त्याने कृष्णाला नमस्कार केला आणि तो आपला परिवार व हजारो सेवक बरोबर घेऊन महासागराच्या दिशेने गेला; मग कृष्णासहित सर्व गोकुळवासी आपापल्या घरी परतले.
श्रीविष्णु पुराण अंश-५ (कृष्णकथा भाग-२) (क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल : ९४२२७६५२२७
Vishnu Puran Shrikrishna Bal lila by Vijay Golesar