अधिक मास विशेष – ३२
श्री विष्णु पुराण अंश-३ (भाग ८)
दैत्यांच्या पराभवासाठी
श्रीविष्णुने केली मायामोहाची निर्मिती
श्रीविष्णु पुराणच्या कालच्या भागात और्व मुनींनी महात्मा सगर यांना श्राद्धाचे महत्व आणि पितरांना तृप्त करण्यासाठी श्राद्ध कसे करावे हे सांगितले .यानंतर त्यांनी श्राद्धासाठी उचित व अनुचित वस्तू कोणत्या असतत ते सविस्तर सांगितले. ते म्हणाले,
“राजा! श्राद्धविधीमध्ये हवि, मासे, सशाचे, मुंगुसाचे, डुकराचे, बकऱ्याचे, कस्तुरीमृगाचे तसेच काळविटाचे, बनगायीचे व मेंढ्याचे मांस आणि गायीचे दूध व तूप वापरले तर पितर एकेक महिना जास्त तृप्त होतात. तसेच वार्धीणस पक्ष्याचे मांस, गैंड्याचे मांस व मध फार उत्कृष्ट आहे.
हे पृथ्वीपती। जो पुरुष गयेला जाऊन तिथे श्राद्ध करतो त्याचे पितर तुप्त होतात व त्याच्या जन्माचे सार्थक होते. हे नरवीरा! देवधान्य,नीवार, श्याम व सफेद रंगाच्या साळी तशाच विविध वनौषधीसुद्धा श्राद्धासाठी योग्य आहेत.
मालकांगणीची फळे ,मूग, गहू,धान्य,तीळ,मटारदाणे व मोहर्या या गोष्टी श्रद्धात असतील तर उत्तम आहे. शेतातील नवीन पीक (धान्य) मोठे उडीद, लहान उजीद मसूर, लाल भोपळ गाजर, धान्य पाखडताना पडलेल्या धान्याचे पिठ,सैंधव मीठ,हिंग ही चांगली आहेत.
लालभडक रंगाची फळे उदा. दोघंटो, आलुखार, साधे मोठ शास्त्रांनी निषिद्ध ठरविलेल्या इतर वस्तू या श्रद्धात त्याज्य आहेत
तसेच रात्रीच्या वेळी काढलेले पाणी तोड लावीत नाही असे पाणी, गढूळ आणि वास येणारे पाणी श्राद्धात बोएक असलेला पशु उंटी शोळी हरिणी आणि म्हेल यांचे दुमदेखील वापरू नये.
नपुंसक, महात्म्यांनी शिकार केलेला चांडाळ पापी पाखंडी (शास्त्रांना न जुमानणारा), रोगग्रस्त, कोंबडे ,कुत्रे, नग्न (अवैदिक), माकड, रानडुक्कर,विटाळशी बाई, सुवेरातील अगर सुतकी व्यक्ती आणि प्रेतवाहक यांची जर दृष्टी पडली तर देवता व पितर येत नाहीत.
म्हणून श्राद्ध करतेवेळी प्रथम स्थानशुद्धी करून घ्यावीतेसा जमिनीवर तीळ शिंपडावे
श्राद्धासाठीचे अन्न असे असावे की, त्यात नखे, केस व घाण नसावी अगर ते धान्य दोनदा शिजवलेले नसावे किंवा शिळे नसावे. श्रद्धाळूचे नाव व गोत्राचा उच्चार करून अर्पिलेले भोजन पितरांना जसे हवे तसे होऊन मिळते.
या बाबतीत असेही ऐकिवात आहे की, पूर्वी एकदा पितृदेवांनी मनूचा पुत्र इक्ष्वाकू याला कलाप नामक उपचनात असे म्हटले होते की-
आमच्यासाठी गयेला जाऊन, तिथे आदरपूर्वक श्राद्ध करून पिंडदान करील असा पुरूष कुळांत कधी जन्मेल काय ?
त्याच प्रमाणे पावसाळ्यातील मघा नक्षत्राने युक्त अशा त्रयोदशीला आमच्यासाठी मध व खीर यांचे दान करील, असा कुणी आमच्या वंशात जन्मास येईल काय ?
किंवा गौरी कन्येशी विवाह करून, निळ्या रंगाच्या बैलाचा वृषोत्सर्ग करणारा अगर विधिपूर्वक दक्षिणेसहित अश्वमेध यज्ञ करणारा, श्रद्धावान असा कुणी आमच्या वंशात निपजेल काय ?
मायामोहाची निर्मिती
पराशर म्हणाले – “अहो मैत्रेय मुनी! पूर्वी महात्मा सगर यांनी भगवान और्व यांना विचारले असता त्यांनी जो उपदेश केला तो मी तुम्हाला सांगितला आहे. सदाचाराचा त्याग केला तर कुणीही सद्गतीला जाऊ शकत नाही.’
त्यावर मैत्रेय म्हणाले “हे भगवान् ! मला नपुंसक, अपविद्ध आणि रजस्वला (विटाळशी स्त्री) यांच्याविषयी संपूर्ण कळले परंतु ‘नग्न’ असे कुणाला म्हटले जाते ते मात्र ठाऊक नाही. तरी कृपा करून मला सांगा की नग्न म्हणजे कोण? त्याचे आचरण कोणत्या प्रकारचे असते? तुम्ही सर्वज्ञ असल्यामुळे तुम्हीच ते सांगू शकाल.”
त्यावर महात्मा पराशरांनी बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले
“ऐका! ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हे तीन वेद सर्व वर्णियांसाठी आवरणे आहेत. जो विपरीत विचाराने त्यांचा त्याग करतो तो पापी ‘नग्न’ होय.
कारण सर्व वर्णांना आच्छादन या तिन्ही वेदांचे आहे. जर तेच काढून टाकले तर असा पुरुष नग्न बनतो यात शंकाच नको. आमचे आजोबा धर्मज्ञ वसिष्ठ यांनी या बाबतीत महात्मा भीष्माचार्य यांना जे सांगितले होते ते त्या वेळी मी ऐकलेले आहे. आज मी तेच तुम्हाला सांगतो.
फार पूर्वी कोणे एके काळी देव आणि असुर यांच्यात युद्ध झाले ते १०० दिव्य वर्षे एवढा काळ चालले. त्यांत देव असुरांकडून पराभूत झाले शेवटी युद्ध सोडून देव क्षीरसमुद्राच्या उत्तर किनाऱ्यावर गेले व तिथे भागवान विष्णूची आराधना करीत तप करू लागले. ते म्हणाले.
आम्ही सर्व लोकैकनाथ विष्णूदेवाने प्रसन्न व्हावे याकरिता जशी वेड्यावाकड्या शब्दांत स्तुती करती आहोत, तिने तो आदिपुरुष संतुष्ट होवो,
ज्याच्यापासून यच्चयावत चराचर उत्पन्न झाले आहे व शेवटी ज्याच्यात सामावणार आहे. त्याची यथार्थ स्तुती योग्य शब्दात कोण बरे करू शकेल?
हे प्रभू! आपले सत्य स्वरूप वाणीला अगोचर आहे. तरीही शत्रूनी पराभव केल्याने हतबल होऊन आम्ही अभयदान मिळावे यासाठी (जशी जमेल तशी) तुझी स्तुती गात आहोत,
पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पाच तत्त्वे, अंतःकरण चतुष्ट्य, मूळ (आद्या) प्रकृती आणि तिच्याही पलीकडचा परमपुरुष हे सर्वकाही तूच आहेस.
हे सर्व भूतांतर स्थित! ब्रह्मापासून स्तंबापर्यंत स्थान, काल भेदांसह हा संपूर्ण चराचर प्रपंचपसारा तुझा देह आहे.
तुझ्या नाभिकमळातून विश्वाचा उपकारास्तव जे प्रकटले ते तुझे आय रूप आहे. अशा त्या तुझ्या रूपाला, हे देवा! आम्ही बंदन करीत आहो.
इंद्र, सूर्य, वसूगण, रुद्र, अश्विनीकुमार, मरुत्, देव आणि सोम यांच्यासहित विविध जातीचे आम्ही सर्व तुझीच रूपे आहोत म्हणून आम्ही त्या रूपातील तुला वंदन करतो आहोत.
हे गोविंदा! जी गर्विष्ठ, अज्ञानी तसेच दांभिक व तितिक्षारहित अशा तुझ्या दैत्यमूर्तीला नमन असो.
ज्या मंदसत्व स्वरूपात हृदयात ज्ञानवाहिनी नाड्या नसतात य विषयलोभ भरलेला असतो अशा तुझ्या यक्षरूपाला नमस्कार असो.
क्रौर्य व माया यांनी भरलेले व नखशिखान्त तामसी असे तुझे जे राक्षस रूप आहे त्यालासुद्धा आम्ही वंदन करीत आहो.
जनार्दना। स्वर्गाचे रहिवासी धार्मिक असे जे लोक आहेत, त्यांना त्यांच्या पुण्यकृत्यांची फळे देणारा धर्म, हे तुझे एक रूप असून त्यालाही आम्ही नमन करतो.
पाण्यात, आगीत प्रवेश करूनही जे नेहमी प्रसन्न व अबाधित असते, ते सिद्ध नावाचे तुझे रूप आहे. अशा तुझ्या सिद्ध स्वरूपाला नमस्कार !
हे श्रीहरि! अत्यंत रागीट आणि कामोपभोगामध्ये समर्थ, पृथ्वीला पेलून धरणारे व दोन जिभा असलेले असे जे तुझे नागरूप आहे त्याला नमस्कार असो.
हे विष्णूदेवा! आपले मुनिमय स्वरूप जे आहे ते ज्ञानाने भरलेले, शांत, निर्दोष व निरंजन असे आहे. त्याला आम्ही वंदन करतो.
जेव्हा कल्पान्त ओढवतो तेव्हा अनावर अशा कालरूपाने सर्व चराचर गिळून टाकणाऱ्या पुंडरीकाक्ष देवा! तुझ्या त्याही रूपाला बंदन असो,
प्रलयकाळी देवांसहित एकूण एक प्राण्यांना गिळून नृत्य करणाऱ्या तुझ्या रुद्ररूपाला आमचे वंदन!
रजोगुणयुक्त असल्यामुळे सर्वत्र कर्माचा खेळ खेळणाऱ्या तुझ्या मानवी
रूपाला – हे जनार्दना – आम्ही नमस्कार करतो.
अठ्ठावीस प्रकारचे वध करणारे तुझे जे तमोगुणी आणि अनावर स्वरूप आहे, त्याला – हे सर्वात्मका – आम्ही वंदन करतो.
जगताचा आधार व यज्ञाचा एक भाग असणारे अर्थात झाडेझुडपे, बेली, वृक्ष, गवत, गिरी अशा सहा प्रकारांचे जे उद्भिज्ज रूप त्याला नमन असो.
पशुपक्षी, मनुष्यजात, देव वगैरे सर्व प्रकारच्या योनी, आकाशासहित पाच महाभूते, त्यांच्या शब्द वगैरे तन्मात्रा असे सर्व काही तूच आहेस. अशा तुला सर्वात्म्याला आम्ही वंदन करतो.
हे परमात्म्या! तुझे महत्तत्वादिरूप हे जगाच्याही फार पलीकडे असून ते सर्वांचेच आदिकारण आहे, त्याच्या तुलनेत अन्य काहीचनसून ते मूळप्रकृतीचे सुद्धा आदिकारण आहे, अशा त्या रूपाला नमन असो.
भगवंता! तुझ्या रूपाचे काही मोजमाप नाही. ते निरंजन असून ऋषींचे ध्येय आहे. त्याला ना रंग ना रूप तरीही ते परमपवित्र आहे. त्याला आम्ही वंदन करतो.
आमच्या देहांत तसेच एकूणएक प्राण्यांच्या देहात असणारे, अजन्मा व अविनाशी आणि एकमेव असे इतरही सजीव आणि निर्जीव अशा सर्वात असलेले तुझे जे ब्रह्मरूप आहे त्याला आम्ही नमन करतो.
ते परमपद ब्रह्म अर्थात आत्मा अशा सनातन, आदिबीज, अविनाशी, निरंजन व सर्व चराचर विश्व कवेत घेणाऱ्या वासुदेवा! आमचे तुला वंदन आहे!
असे बोलून पराशर पुढे म्हणतात –
हे मैत्रेय मुनी! जेव्हा स्तोत्र संपले तेव्हा शंख चक्र व गदा हाती घेतलेले आणि गरुडावर बसलेले परमात्मा श्रीहरि सर्वांसमोर प्रकट झाले. तेव्हा सर्व देवांनी हात जोडून प्रार्थना केली की,
“हे नाथ! आमच्यावर प्रसन्न व्हा आणि शरणागत अशा आमचे दैत्यांपासून रक्षण करा. भगवंता! हाद वगैरे दैत्यांनी ब्रह्मदेवाला न जुमानता आमच्या व सर्व त्रैलोक्याच्या तोंडचा घास काढून घेतला आहे. आम्ही जशी तुझी लेकरे आहोत तसेच तेदेखील आहेत पण अज्ञानीपणा असल्यामुळे आम्ही भेदभाव करतो.
आमचे ते दैत्य शत्रू वर्णाश्रमधर्म पाळून वेद व शास्त्रांनुसार आचरण करतात शिवाय ते तपस्वी सुद्धा आहेत; मग ते आमच्याकडून कसे बरे मारले जातील?
तर हे सर्वात्मका! असा काहीतरी उपाय सांग की, जो केल्याने आम्ही त्यांचे पारिपत्य करू शकू!”
पराशर पुढे म्हणाले-असे त्यांचे म्हणणे ऐकून विष्णू भगवंताने आपल्या शरीरातून ‘मायामोहा’ची उत्पत्ती केली व त्याला देवतांच्या सोबत पाठवून दिला आणि म्हणाला-
“हा मायामोह त्या सगळ्या दैत्यांच्या बुद्धीला मोहात पाडून त्यांची बुद्धी भ्रष्ट करील, मग ते वेदमार्ग सोडून देतील व तुमच्या हातून मारले जातील, अहो देवगण हो। देव, दैत्य अथवा कुणीही जर का ब्रह्मदेवाच्या सृष्टिरचनेत ढवळाढवळ करून अराजक माजवतील तर ते माझ्याकडून मारले जातील.
तेव्हा तुम्ही निश्चितपणे माघारी निघा आणि भय बाळगू नका. हा मायामोह पुढे जाऊन तुमचा मार्ग निर्विघ्न करील.”
पराशर म्हणाले – “श्रीविष्णूची आज्ञा ऐकल्यावर ते सगळे देवगण पुन्हा नमस्कार करून आणि मायामोहाला सोबत घेऊन दैत्य होते तिथे गेले.
श्री विष्णु पुराण अंश-३ भाग -८ (क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल-९४२२७६५२२७
Vishnu Puran Maya Moh Nirmiti by Vijay Golesar