शुक्रवार, ऑक्टोबर 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

विशेष लेख…पैशासाठी इमान विक्रीला

मे 21, 2025 | 12:05 pm
in राष्ट्रीय
0
Untitled 41

भागा वऱखाडे
लोक पैसा आणि धर्मासाठी काहीही करायला तयार होतात. सौंदर्याच्या जोरावर पैसे कमवण्याचा नवीन उद्योग आता सुरू झाला आहे. पाकिस्तान ‘हनीट्रॅप’च्या माध्यमातून लष्कराच्या अनेक अधिकारी, जवानांना इमान विकायला भाग पाडतो. पाकिस्तानमध्ये बनावट खाती आणि सौंदर्यवतींचे बनावट फोटो टाकून भारतातील अनेकांना नादी लावले आहे. त्या माध्यमातून लष्कराची गोपनीय माहिती मिळवली जाते. आता युटयुबर महिला आपल्या सौंदर्याचा वापर करून पैस कमवतात आणि देशाभिमान गहाण टाकतात. ज्योती मल्होत्रासारख्या अनेकांनी या देशाचे मीठ खाऊन देशाविरोधात द्रोह केला. त्यांना व्हायची ती शिक्षा होईल; परंतु आपल्या जवळ राहणाऱ्यांकडे अचानक जास्त पैसा यायला लागला आणि त्यांचे परदेश दौरे वाढत असतील, तर आता त्याबाबत यंत्रणांना वेळीच जागरूक करणे आवश्यक आहे.

गेल्या दोन आठवड्यात पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली एका युट्युबरसह किमान १२ जणांना अटक करण्यात आली आहे. तपासात असे दिसून आले आहे, की हे सर्व जण उत्तर भारतात सक्रिय असलेल्या पाकिस्तानशी जोडलेल्या हेरगिरी नेटवर्कचा भाग होते. यापैकी ६ जण पंजाबमधून आणि चार जण हरियाणामधून पकडले गेले आहेत. यामध्ये हरियाणाच्या युट्युबर ज्योती मल्होत्राचेही नाव आहे. पोलिस कोठडीदरम्यान ज्योती मल्होत्राला पाकिस्तानी लोकांचे कौतुक करणाऱ्या व्हिडीओंबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तिने सांगितले, की असे व्हिडीओ बनवणे हा तिचा अभिव्यक्ती करण्याचा मूलभूत अधिकार आहे. मूलभूत अधिकाराचा गैरवापर करून त्याबद्दल यत्किंचीतही पश्चाताप न होणाऱ्यांचा किती ब्रेनवॉश झाला असावा, हे समजण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे. पहलगाम हल्ल्यानंतरच्या व्हिडीओवर ती पर्यटकांवरच चुकीचे खापर फोडते. ती म्हणते, की जे काही घडले ते आमच्या पर्यटकांच्या चुकीमुळे झाले. जेव्हा आपण बाहेर जातो, तेव्हा आपण सतर्क आणि जागरूक राहिले पाहिजे. पहलगाम घटनेसाठी ती सरकारलाही दोष देत आहे. पहलगाममध्ये योग्य सुरक्षा व्यवस्था नव्हती, असे ती म्हणते. ज्योती मल्होत्रा ‘ट्रॅव्हल विथ जो’ नावाचे एक युट्युब चॅनल चालवते. तिच्या युटयुब चॅनेलचे ३.७७ लाख सबस्क्राइबर आहेत. मल्होत्रा हिच्याविरुद्ध अधिकृत गुपिते कायदा आणि बीएनएसच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०२३ मध्ये ज्योती पाकिस्तान उच्चायुक्तालयातील दानिशच्या संपर्कात आली. ती तिथे पाकिस्तानात जाण्यासाठी व्हिसा मिळविण्यासाठी गेली होती. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारत आणि पाकिस्तानमधील चार दिवसांच्या लष्करी संघर्षादरम्यान, ज्योती दानिशच्या संपर्कात होती आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्थाने तिला आपला दूत म्हणूनच जणू नेमले होते. ज्योती मल्होत्राने बनवलेल्या एका व्हिडीओमध्ये ती दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात इफ्तार पार्टीला उपस्थित राहताना दिसली होती. हा व्हिडीओ तिच्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी असलेल्या कथित सहभागाचा ठोस पुरावा आहे. ती पाकिस्तानी दूतावासाच्या अधिकाऱ्याला अशा प्रकारे भेटताना दिसते, जणू ती त्याला आधीही भेटली आहे. पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्याचे नाव अहसान-उर-रहीम उर्फ दानिश आहे. व्हिडीओमध्ये ज्योती या कार्यक्रमाच्या भव्यतेचे कौतुक करताना दिसत आहे. तिने वारंवार पाकिस्तानला भेट देण्याची आणि व्हिसा मिळवण्याची इच्छाही व्यक्त केली. पहलगाम हल्ल्यानंतर १३ मे २०२५ रोजी भारत सरकारने या दानिशला ‘पर्सोना नॉन ग्राटा’ (अवांछित) घोषित केले आणि २४ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले. या पार्टीत ज्योती चीनी अधिकाऱ्यांनाही भेटली. तिथे तिने मला चीनला जायला खूप आवडते, तुम्ही मला व्हिसा कधी देणार आहात? अशी विचारणा केली होती.

ज्योती ‘हाय प्रोफाइल पार्ट्यां’मध्ये महत्त्वाच्या लोकांशी ओळखी करण्याचा प्रयत्न करायची. तिने तिच्या चॅनेलद्वारे पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा दाखवणारे व्हिडीओ बनवले. यासाठी, ”पाकिस्तानमधील भारतीय मुलगी” ही लघुप्रतिमा सर्वाधिक वापरली गेली. यापैकी एका व्हिडीओला १२ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. काही व्हिडीओंना दहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एवढेच नाही तर ज्योतीने तिच्या ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्म’वर अपलोड केलेल्या सर्व व्हिडीओंपैकी बहुतेक व्हिडीओ पाकिस्तानशी संबंधित आहेत. यापैकी, पाकिस्तान उच्चायुक्तालयातील इफ्तार पार्टीमध्ये ज्योतीची उपस्थिती आणि दानिश, त्याची पत्नी आणि इतर व्हीआयपींसोबतच्या तिच्या भेटीचा व्हिडीओ सर्वाधिक चर्चेत आहे. पाकिस्तानमध्ये बनवलेल्या प्रत्येक व्हिडीओमध्ये ज्योतीने भारत आणि पाकिस्तानमध्ये सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्योतीने २२ ऑक्टोबर २०१८ रोजी तिचा पासपोर्ट बनवला. त्यानंतर तिने दोनदा पाकिस्तानला भेट दिली. ज्योती दिल्लीहून एका शीख गटासह दोनदा पाकिस्तानला गेली आहे आणि एकदा एकटीच कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देण्यासाठी गेली आहे. तिने दुबई, थायलंड, इंडोनेशिया, नेपाळ, भूतान, चीन, पाकिस्तान आणि बांगला देशाचा प्रवास केला आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यानंतर तिने तपास यंत्रणांना सांगितले, की तिला तिच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही. ‘एनआयए’पासून ते ‘मिलिटरी इंटेलिजेंस’पर्यंत सर्वजण ज्योतीची चौकशी करत आहेत. देशातील विविध एजन्सींनी ज्योतीची चौकशी सुरू केली आहे. ज्योतीने चौकशीदरम्यान सांगितले, की हरकिरत सिंग नावाच्या व्यक्तीने तिची पाकिस्तानी अधिकारी अहसान-उर-रहीम उर्फ दानिशसोबत भेट घडवून आणली होती. पोलिसांनी चौकशीनंतर हरकिरत सिंगला सोडले आहे; परंतु त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाईल. हरकित सिंग हे हरियाणा शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचा पर्यवेक्षक आहे. पाकिस्तानला जाणाऱ्या गटासाठी व्हिसा मिळवून देण्याचे मुख्य काम तो पाहत असे. ज्योतीसोबत अनेक ‘सोशल मीडिया इन्फ्लुएंसर’ दानिशच्या संपर्कात आहेत. ज्योतीच्या पाकिस्तान भेटीचा सर्व खर्च पाकिस्तान उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या दानिशने केला. दानिशने ज्योतीला पाकिस्तानातील सर्वांना भेटण्याची व्यवस्था केली. दानिशच्या विनंतीवरून, ती पाकिस्तानात त्याच्या ओळखीच्या अली अहवानला भेटली. अली अहवानने पाकिस्तानी सुरक्षा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली होती. ज्योती पाकिस्तानमध्ये शकीर, राणा शाहबाज आणि मरियम नवाज यांनाही भेटली. तपासात असे दिसून आले आहे, की ज्योती आणि दानिशमध्ये जवळचे संबंध निर्माण झाले होते. त्याचा गैरफायदा दानिशने घेतला.

ज्योती वारंवार परदेशात जाते. ती तिथली खास ठिकाणे, जेवण आणि संस्कृतीशी संबंधित व्हिडीओ बनवते आणि अपलोड करते. तिने अलिकडेच झालेल्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यांवरील प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचे व्हिडीओ बनवून अपलोड केले. हिसार पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये युट्युबर ज्योती मल्होत्रा आणि तिच्या पाच मैत्रिणींचा समावेश आहे. आतापर्यंतच्या पोलिस तपासात असे दिसून आले आहे, की आरोपी पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना संवेदनशील माहिती देत होते. अटक केलेल्या संशयितांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जात आहे आणि त्यांच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे फॉरेन्सिक विश्लेषणदेखील केले जात आहे. पंजाब आणि हरियाणामधून झालेल्या अटकेव्यतिरिक्त, पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस’ (आयएसआय) च्या एका कथित एजंटला रविवारी उत्तर प्रदेशातील रामपूर येथून विशेष कार्य दलाने अटक केली. पंजाब पोलिसांनी अमृतसरमधील अजनाला येथील रहिवासी फलकशेर मसीह आणि सूरज मसीह यांनी सीमावर्ती जिल्ह्यातील लष्करी छावणी क्षेत्रे आणि विमानतळांची संवेदनशील माहिती आणि छायाचित्रे ‘आयएसआय’ला पाठवली. दोन्ही आरोपी लष्कराच्या हालचाली, सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) कॅम्प आणि विमानतळ, छायाचित्रे आणि इतर संवेदनशील डेटा यासारखी महत्त्वाची माहिती गोळा करत होते आणि ती पाकिस्तानमधील त्यांच्या हँडलरना पाठवत होते. दिल्लीतील उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या पाकिस्तानी अधिकारी दानिशशी संबंधित हेरगिरीच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली एका महिलेसह आणखी दोघांना अटक केली होती. आरोपींची ओळख पटली आहे ती गुजाला (३१) आणि यामीन मोहम्मद (दोघेही मालेरकोटला येथील रहिवासी) अशी आहे. पोलिस तपासानुसार, ते (गुजाला आणि यामिन) गोपनीय माहिती शेअर करण्याच्या बदल्यात ऑनलाइन व्यवहारांद्वारे पैसे मिळवत होते. चौकशीदरम्यान, गुझालाने नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला भारतीय सैन्याच्या हालचालींबद्दलची गोपनीय माहिती दिल्याची कबुली दिली आहे. गुजाला पैशासाठी पाकिस्तानी गुप्तहेर बनला. गुजालाने ती पैशासाठी हे करत होती आणि आरोपी अधिकाऱ्याने तिला ‘यूपीआय’द्वारे दोन हप्त्यांमध्ये एकूण तीस हजार रुपये पाठवले होते. ज्या देशाचे मीठ खातो, त्या देशाशी गद्दारी करताना त्यांना काहीच वाटले नाही, ही गंभीर बाब आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिवसेना शिंदे गटाने माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी….

Next Post

धक्कादायक…. मुख्याध्यापिकेने शिक्षक पतीचा केला खून…शाळेतल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मृतदेह जाळला

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Home Flat e1681892298444
मुख्य बातमी

घरकुल बांधणीत या जिल्ह्याने रचला नवा विक्रम! ५० हजारांहून अधिक घरकुलांची पूर्ती…

ऑक्टोबर 22, 2025
PIC1OG8A
महत्त्वाच्या बातम्या

स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला लष्कराचा मिळाला हा बहुमान… गोल्डन बॉय आता या पदवीने ओळखला जाणार… 

ऑक्टोबर 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा भाऊबीजेचा दिवस… जाणून घ्या, गुरुवार, २३ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 22, 2025
IMG 20210302 WA0026
संमिश्र वार्ता

दिवाळीनंतर फिरायला जायचंय? या बीचवर नक्की जा… येथील अभूतपूर्व नजारा पाहून खुशच व्हाल…

ऑक्टोबर 22, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय… काढला हा शासनादेश… अशी मिळणार मदत…

ऑक्टोबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा दिवाळी पाडव्याचा दिवस… जाणून घ्या, बुधवार, २२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 21, 2025
diwali padva balipratipada
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा- असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 21, 2025
Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीत या ११ गोष्टी लक्षात ठेवा… ज्योतिष शास्त्री प्रशांत चौधरी यांनी दिल्या या टीप्स…

ऑक्टोबर 21, 2025
Next Post
crime 71

धक्कादायक.... मुख्याध्यापिकेने शिक्षक पतीचा केला खून…शाळेतल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मृतदेह जाळला

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011