सौ.स्वाती मकरंद कुलकर्णी
“ चैत्रमास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुकत तरीही वात उष्ण हे किती, दोन प्रहरी का ग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला…” आकाशवाणीवर हे गीत ऐकून आले आणि क्षणार्धात बालपणीचा राम डोळ्यासमोर येऊ लागला. या ग.दि.माडगूळकर यांच्या गीतरचनेतील वर्णनाप्रमाणे ज्याच्या जन्मक्षणी सूर्य ही थांबला,त्या देवता रुपी व्यक्तीची परमोच्च पातळी लक्षात येते. महर्षी वाल्मिकींनी ‘रामायण’ महाकाव्यात सर्व सामान्यातील व्यक्तिरेखा वर्णन केलेल्या दिसतात, आणि त्या अतिशय सुंदर पद्धतीने जगासमोर मांडल्या आहेत. राम ही व्यक्ती देवत्व पदापर्यंत पोहचली आणि आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनली.आताच्या कोरोना महामारीतून बाहेर सुखरुप बाहेर येण्यासाठी अनेक घराघरांत, सोसायटीमध्ये रामरक्षेचे नित्यनेमाने पठण सांजसमयी होत असे , अजूनही करीत आहेत.ही प्रार्थना शक्ती त्या विषाणूला संपविण्यास नक्कीच साहाय्यभूत ठरली. इतका प्रगल्भ विश्वास जनसामान्यांचा दिसतो.,

परंतु ; मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम’ असे म्हणताना फक्त श्रीरामाचा विचार होतो,त्याची कारणे लक्षात घेताना “ मर्यादा पुरुषोत्तम प्रभूरामचंद्र” म्हणजे…जो अत्यंत श्रेष्ठ, सर्वोच्चगुणांचा समुच्चय असा राम,एक उत्कृष्ट प्रजापालक राजा, धनुर्धर योध्दा,खरा कर्मयोगी,संकटांना न घाबरणारा साधुपुरुष.महर्षी वाल्मिकींच्या काव्यातील नायक ‘श्रीराम ;.तो देव नसून आपत्ती सहन करता करता अनेक दु:ख सोसून देवत्व प्राप्त झालेली व्यक्ती.साक्षात् देवही ज्याची स्तुती करतात की,तू भगवान आहेस , त्यावेळी ही राम त्याला नकार देतो व म्हणतो— “आत्मानंद मानुषं मन्ये रामन दशरथात्मजम् ” रामामध्ये देवत्व रामानेच निर्माण केले आहे .मानव उच्च ध्येय, आदर्श ठेवून शकतो व तशीच व्यक्ती देवत्व मिळवू शकते हे रामाने स्वतःच्या जीवनाद्वारे दाखवलेले दिसते.विकार, विचार तसेच सर्व व्यावहारिक कार्यात त्याने मानवी मर्यादा ओलांडली नाही; म्हणून “मर्यादा पुरुषोत्तम”.सद्गुणांचे शिखर व समुच्चय. राम हा विष्णूचा अवतार पण संपूर्ण रामायणात राम स्वदेवत्व विसरला आहे.त्यामुळे वाल्मिकींनी त्यांच्या मनुष्याचे द्योतक अशा हर्षशोकांचे वर्णन केले आहे.सीता शोक , सुग्रीवावरील क्रोध,अरण्यकांडातील शोकगीतै दिसून येतात . अलौकिक कत्रुत्ववान विभूती म्हणजे राम.प्रथम रामनंतर प्रभू म्हणून प्रभूराम असे म्हणतो.स्वार्थत्यागाची पराकाष्ठा म्हणजे राम.रामाच्या राज्याभिषेकासाठी अनेक राजे, विद्वान, अधिकारी यांनी राजा दशरथाकडे आपले अभिप्राय प्रकट केले होते यातून त्यांची लोकप्रियता, त्यांच्यावरील विश्वास दिसून येतो. राम वनगमन करते वेळी संपूर्ण अयोध्या नगरी त्यांच्या समवेत जायला निघते आणि त्यांच्या प्रेमापुढे राम नसतो,इतकी प्रचंड निष्ठा,त्याग प्रजेची त्यांच्याबाबतीत दिसते.कारण ‘स्वार्थरहित प्रेम मिळविणे’ हे असामान्य व अलौकिक अशाच मनुष्याला शक्य आहे.
पित्रुभक्त राम; जिथे “भरताला राज्याभिषेक व रामाला चौदा वर्षे वनवास” असे राणी कैकयीकडून ऐकताक्षणी मनातील द्वंद्व दिसत नाही,शोक नाही,बंधु भरतालाही समजावितो ‘ मी वनात जात आहे,तू अयोध्येचा राज्य सांभाळ’ – “दैव जात दु:खे भरता ,दोष ना कुणाचा,पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा” असा उपदेश रामाने केलेला दिसतो.म्हणून’पित्रुवचन पालन” हे प्रथम कर्तव्य पुत्राचे असल्याने राम वनवासात जायला तयार होतो.अशा अनेक प्रसंगांमधून रामाच्या “ नियमन व संयम” अशा असामान्य गोष्टी दिसून येतात म्हणून तो “ मर्यादा पुरुषोत्तम”. इक्ष्वाकु वंशातील लोक ज्या महर्षी वसिष्ठांपुढे नम्र होत आले,त्या शांत,तपस्वी,ज्ञाननिष्ठ वसिष्ठांनी रामाची महत्ता जाणली . आईवडील,गुरुंना ही रामाचे ‘दोन शब्द’ मानणे महत्त्वाचे वाटते,येथेच त्याची श्रेष्ठता,त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विजय आहे.
बिभीषणाला स्विकारण्यात रामह्रद्याची श्रीमंती होती तर लंकेतुन सीता परत आली तेव्हा एक राजा म्हणून तिचा त्याग करतो यात कठोरता दिसून येते.स्वार्थत्यागाची पराकाष्ठा, अभिजात नेतृत्व आणि अलौकिक असे व्यक्तिमत्व यांची त्रिपुटी म्हणजे श्रीराम.रघुवंशाच्या मंदिराचा एक श्रेष्ठ ध्वज म्हणजे प्रभुराम. “ तेषां केतुरिव: श्रेष्ठ: राम: सत्यपराक्रम: “असे वाल्मिकी म्हणतात. लोकोत्तर पुत्र,लोकोत्तर बंधू, मित्र, शत्रू,राजा,लोकोत्तर वल्लभ, धर्मनिष्ठ इत्यादी सर्वच लोकोत्तर स्वरूपाने पुरुषोत्तमाच्या स्थानी होत्या. वडिलांचा शब्द ब्रह्मवाक्य मानणारा,.एक आदर्श बंधू,जो भरतभेटीसाठी अधीर झालेला,लक्ष्मणाला बहिस्थ प्रमाण मानणारा,, उच्चतम मानवाचे चित्र म्हणजे प्रभू राम, अलौकिक मित्र म्हणजे गुहा व सुग्रीव.या दोघांवर रामाचे प्रेम अभेद्य असे होते आणि त्याही दोघांनी तितकाच एक मित्रत्वाचा दिव्य आदर्श उभा केलेला आहे.
रावणासारख्या शत्रूवरही वधानंतर अग्निसंस्कार करण्यास मागेपुढे पहात नाही, म्हणजे शत्रुत्व ही लोकोत्तर.रामासारखा शत्रू असण्याला ही भाग्य असावे लागते.” सुवर्णाची लंका ही आपणाला नको”,असे म्हणून रामाने राज्य बिभीषणाला दिले,इतके जीवन व्यवहार शुध्द असणारा राम चालत आलेल्या राज्यपालांचा त्याग करतो.लहानपणी शिवधनुष्य भंग,परशुरामाचा पराभव,तारका वध, महापराक्रमी वाली वध,रावणराज्याचे उच्चाटन इत्यादी अत्यंत महान कार्य स्वपराक्रमाने, आत्मविश्वासाने ‘राम’ या महापुरुषाने केलेली दिसतात. कर्तव्य व भावना यात कर्तव्य श्रेष्ठ मानणारा,सीतेवर अमर्याद प्रेम असतांनाही एक राजा म्हणून तिचा प्रजाजनांसाठी त्याग करणारा,सीतात्याग हे आत्मबलिदानाच्या उच्चतम भावनेचे प्रतिक आहे.असा हा लोकोत्तर वल्लभ श्रीराम.स्व जीवन आत्म तज्ज्ञाने माणसांना नैतिक जीवन दर्शन देणारी,स्वसामर्थ्याने पाशवी सामर्थ्याचा नाश करणारी व्यक्ती हाच रामाचा आदर्श. गीतरामायण, श्रीसमर्थ रामदास स्वामींचे काव्य असो किंवा तुलसीदास दोहे असोत ; राम महती’तितकीच जिव्हाळ्याची वाटते कारण मनुष्य रुपातून देवत्व प्राप्त केलेली व्यक्ती असल्याने सर्व
सामान्यांना अधिक जवळची वाटते, सकाळी फिरायला निघालेल्या काका मित्रांनी एकमेकांना भेटल्यावर “ राम राम” असे म्हणतच हस्तांदोलन केले….असे अनेक प्रसंग, आपल्या रोजच्या जीवनात घडतांना दिसतात आणि अगदी नकळत शब्द ओठी येतात राम,राम . तुलसीदास रचनेतील दोह्यात —” श्रीरामचंद्र क्रुपालु भजुमन हरण भव्य दारुणम्|” असा हा राम संकटात, आनंदात आणि सर्व गोष्टींत मार्गदर्शक,आपल्या विचार,क्रुती, भावनांशी एकरुप झालेला हा प्रभु. “ हा देह राम व्हावा…..” अशी प्रामाणिक इच्छा त्याच्या वर असलेल्या भक्तीत लीन झालेल्या व्यक्तींची दिसून येते.
शेवटी एकच म्हणावेसे वाटते-
“ अविरत ओठी या विना नाम
श्रीराम जयराम जयजय राम
रामनाम हे सदा सुखाचे
निदान जाणा परमेशाचे
पतितपावन अवघे नाम || श्रीराम जय……
राम जन्मदिन उत्सवाच्या निमित्ताने या महापुरुषालाया मी त्रिवार वंदन.
|| श्रीरामचंद्रार्पणमस्तु ||
लेखन :-
सौ. स्वाती मकरंद कुलकर्णी, नाशिक
8007177744