सोमवार, जुलै 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विशेष लेख….वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम (WILP) आणि रोजगार कौशल्य….

by Gautam Sancheti
जुलै 16, 2025 | 10:58 am
in राज्य
0
IMG 20250715 WA0327

डॉ.सतीश पवार
आजच्या गतिमान आणि स्पर्धात्मक युगात युवकांना केवळ शैक्षणिक पदव्या असून चालत नाही, तर उद्योग क्षेत्रात त्वरित रोजगार मिळवण्यासाठी त्यांच्याकडे व्यावसायिक कौशल्य आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव असणे तितकेच महत्त्वाचे ठरते. या पार्श्वभूमीवर वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम (WILP) ही संकल्पना अत्यंत उपयुक्त व परिणामकारक ठरत आहे.

WILP म्हणजे शिक्षण आणि प्रत्यक्ष उद्योगातील कामाचा अनुभव यांचा समन्वय. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी शिक्षण घेत असतानाच उद्योगांमध्ये काम करून प्रत्यक्ष अनुभव मिळवतात. यामुळे विद्यार्थी अधिक सक्षम, आत्मविश्वासी आणि रोजगारक्षम बनतात. उद्योगांनाही प्रशिक्षित मनुष्यबळ सहज उपलब्ध होते, जे त्यांच्या कामासाठी तत्पर आणि तयार असते. 15 जुलै – वर्ल्ड स्किल डे ही जागतिक युवा कौशल्यांच्या सन्मानाची आणि जागरूकतेची दिनविशेष आहे. या दिवसाचे औचित्य साधून आपण WILP सारख्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले पाहिजे, जे केवळ कौशल्याभिवृद्धीस नव्हे तर रोजगार निर्मितीस आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरते.

WILP ही संकल्पना नव्या भारतातील शिक्षण व उद्योग यांच्यातील दरी भरून काढण्याचे कार्य करत आहे. अशा कार्यक्रमांमुळे शिक्षण अधिक व्यवहार्य, कौशल्याधिष्ठित आणि रोजगाराभिमुख होत आहे. आजच्या वर्ल्ड स्किल डे निमित्ताने आपण सर्वांनी अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणे व अधिकाधिक युवकांना यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करणे ही काळाची गरज आहे. आजचं युग झपाट्याने बदलतं आहे – विशेषतः शिक्षण आणि रोजगाराच्या क्षेत्रात. पारंपरिक शिक्षणपद्धती, जिथे केवळ पुस्तकं आणि परीक्षा यावर भर दिला जातो, ती आता पुरेशी वाटत नाही. उद्योगधंद्यांना आज अशा तरुणांची गरज आहे, जे केवळ सैद्धांतिक ज्ञानात निपुण नसून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन तयार झालेले असावेत – म्हणजेच जे ‘जॉब रे़डी’ असतील. याच गरजेतून वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम (WILP) ही संकल्पना पुढे आली आहे- हे उपक्रम अपरेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम(AEDP) किंवा ;अनुभवाधारित शिक्षण(Experiential Learning) म्हणूनही ओळखले जातात. या कार्यक्रमांचं वैशिष्ट्य असं आहे की, यात विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळते. त्यामुळे केवळ वर्गखोल्यांमध्ये न राहता, ते उद्योगजगतातील वास्तव अनुभवतात, शिकतात आणि स्वतःला घडवतात.

१. शिक्षण आणि रोजगार यांच्यातील वाढती तफावत
आपण अनेकदा ऐकतो की शिक्षण घेऊनही मुलांना नोकरी मिळत नाही. ही फक्त एक भावना नाही, तर आकडेवारीनेही सिद्ध झालेली वस्तुस्थिती आहे. आजही भारतातील पारंपरिक शिक्षणपद्धती आणि उद्योगांची प्रत्यक्ष गरज यांच्यात मोठी दरी आहे. इंडिया स्किल्स रिपोर्ट २०२५ (ISR 2025) च्या मते, देशातील फक्त ५०% पेक्षा कमी पदवीधरच खरोखर ‘रोजगारक्षम’ आहेत – म्हणजेच, नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये त्यांच्या अंगी नाहीत. याचं मुख्य कारण म्हणजे शिक्षणात जे शिकवलं जातं आणि कामाच्या ठिकाणी जे अपेक्षित असतं, त्यात मोठं अंतर आहे. या तफावतीला भरून काढण्यासाठीच वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम (WILP) ही संकल्पना पुढे आली आहे. हे कार्यक्रम विद्यार्थ्यांना शिक्षण घेतानाच उद्योगांमध्ये कामाचा अनुभव घेण्याची संधी देतात –
म्हणजेच ‘शिकताना काम’ आणि ‘काम करताना शिकणं’.

२. वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्रामचं महत्त्व
अ. व्यावहारिक कौशल्यांचा विकास
WILP मध्ये केवळ पुस्तकं नाहीत, तर प्रत्यक्ष प्रोजेक्ट्स, समस्यांचे निराकरण, आणि निर्णय घेण्याचे प्रसंग
यांचा समावेश असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग, क्रिटिकल थिंकिंग आणि स्वतः निर्णय
घेण्याची क्षमता अधिक मजबूत होते.
ब. उद्योग जगताशी थेट संलग्नता
अभ्यासक्रम उद्योगांच्या गरजेनुसार तयार  केले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीनतम तंत्रज्ञान, प्रक्रिया
आणि उद्योगसंबंधी अनुभव मिळतो. UGC ने २०२५ मध्ये जाहीर केलेल्या Apprenticeship Embedded
Degree Programme (AEDP) मार्गदर्शक तत्त्वांनुसार शिक्षण अधिक व्यावहारिक आणि अनुभवाधारित
करण्यात आलं आहे. हे NEP 2020 च्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे.
क. शिकताना कमवा – आर्थिक स्वावलंबन
या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्टायपेंड मिळतं, म्हणजेच शिक्षण घेतानाच काही उत्पन्नही मिळतं. त्यामुळे
ते आपल्या शिक्षणाचा खर्च स्वतः उचलू शकतात आणि थोड्या फार प्रमाणात घरासाठीही हातभार लावू
शकतात.
ड. रोजगाराच्या अधिक संधी
जे विद्यार्थी WILP मध्ये सहभागी होतात, त्यांना कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळण्याची शक्यता अधिक असते.
उद्योग जगताला अनुभव असलेले कर्मचारी हवे असतात आणि WILP मधून आलेले उमेदवार नेमके तेच
देतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा प्लेसमेंट रेट अधिक असतो.

३. WILP मुळे विकसित होणारी रोजगारसिद्ध कौशल्ये
आजचं कामाचं स्वरूप झपाट्याने बदलतंय. World Economic Forum च्या Future of Jobs Report
2023 नुसार २०२७ पर्यंत अनेक सुमारे ६९ दशलक्ष नवीन नोकऱ्या निर्माण होतील, तर ८३ दशलक्ष नोकऱ्या
कालबाह्य होतील. अशा बदलाच्या काळात, जुन्या कौशल्यांवर अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं. नव्या
युगात टिकायचं असेल, तर सतत शिकणं आणि बदलांना सामोरं जाणं हे अनिवार्य होणार आहे.
WILP हे अशा कौशल्यांच्या विकासासाठी एक मजबूत माध्यम ठरतं आहे. यातून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी
ज्ञान नव्हे, तर प्रत्यक्ष कामातून शिकण्याची संधी मिळते. WILP च्या माध्यमातून खालील कौशल्य विकसित
होतात

अ. तांत्रिक कौशल्ये (Technical Skills)
WILP मध्ये शिकताना विद्यार्थी उद्योगांमध्ये काम करतात – तिथे वापरली जाणारी उपकरणं, सॉफ्टवेअर्स,
प्रक्रिया प्रत्यक्ष हाताळतात. उदाहरणार्थ:
 आयटी क्षेत्रातील विद्यार्थी प्रोग्रामिंग भाषा, वेब डेव्हलपमेंट, डेटा बेस मॅनेजमेंट शिकतात.
 मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील विद्यार्थी प्रॉडक्शन मशीनरी, क्वालिटी चेक्स आणि प्रोडक्ट डिझाईनमध्ये
हातखंडा मिळवतात.
ब. सॉफ्ट स्किल्स (Soft Skills)
तांत्रिक कौशल्यं महत्त्वाची असली, तरी केवळ तीच पुरेशी नाहीत. कामाच्या ठिकाणी माणसांशी संवाद,
टीमसोबत काम, आणि परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता तितकीच महत्त्वाची आहे.
WILP विद्यार्थ्यांमध्ये विशेषतः खालील सॉफ्ट स्किल्स विकसित होतात:
 संवाद कौशल्य: स्पष्ट आणि आत्मविश्वासाने बोलणे, ऐकणे आणि प्रतिसाद देणे.
 टीमवर्क: इतरांबरोबर समन्वयाने काम करत सामूहिक यश साध्य करणे.
 लवचिकता: बदलत्या कामाच्या स्वरूपात सहज जुळवून घेणे.
 वेळेचं व्यवस्थापन: एकाच वेळी शिक्षण आणि काम हाताळताना स्वतःचं वेळापत्रक योग्य रचणं.
क. व्यावसायिक नैतिकता आणि शिस्त
कामाच्या ठिकाणी वेळेवर हजर राहणं, जबाबदारीने काम करणं आणि व्यावसायिक वागणूक ठेवणं – ही
मूलभूत मूल्यं WILP विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिकपणे विकसित होतात. यामुळे ते फक्त नोकरीसाठीच नाही, तर
यशस्वी करिअरसाठी तयार होतात.
ISR 2025 मध्ये Global Skills Cartography या कल्पनेवर भर देण्यात आला आहे – ज्यात हे स्पष्ट
झालंय की जर्मनी, जपान, अमेरिका यांसारख्या देशांमध्येही कुशल कामगारांची मागणी वेगाने वाढते आहे.
WILP च्या माध्यमातून भारतीय विद्यार्थी केवळ देशांतर्गत नाही, तर आंतरराष्ट्रीय संधींसाठीही स्वतःला
सक्षम बनवू शकतात .

४. WILP चे प्रकार
WILP (वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम) विविध स्वरूपात उपलब्ध आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना उद्योग-
आधारित शिक्षणाच्या विविध स्तरांवर काम करण्याची संधी मिळते. हे काही प्रमुख प्रकार आहेत:
• इंटर्नशिप (Internship)
इंटर्नशिप म्हणजे एक अल्प मुदतीचा आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव. यामध्ये विद्यार्थ्यांना उद्योगांच्या
कार्यप्रणालींचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. साधारणपणे इंटर्नशिप २ ते ६ महिन्यांच्या कालावधीत असते आणि
विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान, टीमवर्क, आणि उद्योगाच्या ध्येयांची ओळख करून देते. हे विद्यार्थ्यांना आपला
करिअर मार्ग निवडताना मदत करतं.

• अपरेंटिसशिप (Apprenticeship)
अपरेंटिसशिप एक दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रम आहे, ज्यात विद्यार्थी कुशल कामगार म्हणून विकसित
होतात. येथे विद्यार्थ्यांना अधिक वेळ, समर्पण आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञांकडून मार्गदर्शन मिळतं. UGC ने
Apprenticeship Embedded Degree Programme (AEDP) ला प्रोत्साहन दिले आहे, ज्याद्वारे विद्यार्थी
त्याच्या शिक्षणातच अप्रेंटिसशिपचा अनुभव घेऊ शकतात. यामुळे एकाच वेळी शैक्षणिक शिक्षण आणि
व्यावसायिक अनुभव मिळवणे शक्य होते.

५.UGC आणि NEP 2020 ची भूमिका
आज भारतात शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडत आहेत, आणि या बदलांमध्ये UGC (University Grants
Commission) आणि NEP 2020 (राष्ट्रीय शिक्षण धोरण) यांची मोठी भूमिका आहे.

• राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२०
NEP 2020 ने शिक्षण क्षेत्रात नवीन दिशा दाखवली आहे. या धोरणानुसार, शिक्षण अनुभवात्मक, समग्र
आणि एकात्मिक बनवण्यावर जोर दिला गेला आहे. विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता, व्यावहारिक
कौशल्ये शिकवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये Vocational Education आणि Apprenticeship चे
महत्त्व विशेष आहे. हे क्षेत्र विद्यार्थ्यांना नोकरीसाठी तयार करते आणि त्यांना करिअरच्या विविध क्षेत्रात
प्रगल्भ करते.

• UGC AEDP Guidelines 2025
UGC ने २०२५ मध्ये Apprenticeship Embedded Degree Programme (AEDP) साठी मार्गदर्शक
तत्त्वे जारी केली आहेत. यामुळे विद्यापीठांना त्यांच्या विदयार्थ्यांना अप्रेंटिसशिपचा अनुभव त्यांच्या पदवी
अभ्यासक्रमातच देण्याची संधी मिळते. याचा परिणाम म्हणजे, शिक्षण संस्था आणि उद्योग यांच्यात एक
अधिक मजबूत भागीदारी तयार होईल, आणि विद्यार्थी आपल्या शिक्षणाच्या दरम्यानच उद्योगांमध्ये प्रत्यक्ष
अनुभव घेतील.

WILP यशस्वी करण्यासाठी ………
१. शिक्षण संस्था आणि उद्योग यांची भागीदारी:
WILP चं मूळ बळ हे शिक्षण संस्था आणि उद्योग यांच्यातील भागीदारीत आहे. जेव्हा हे दोघं एकत्र येतात,
तेव्हा अभ्यासक्रमही उद्योगाच्या गरजेनुसार बदलता येतो आणि विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे तयार
होतात.

२. शिक्षकांचं अद्ययावत प्रशिक्षण:
शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक असतात. म्हणूनच त्यांना उद्योगात वापरलं जाणारं नवं तंत्रज्ञान, नवे
ट्रेंड्स यांची माहिती असणं अत्यावश्यक आहे. यामुळेच ते विद्यार्थ्यांना अधिक योग्य मार्ग दाखवू शकतात.

  1. विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढवणं:
    WILP म्हणजे काय, त्याचे फायदे काय आहेत, याबाबत अनेक विद्यार्थ्यांना अजून पुरेशी माहिती नसते.
    त्यामुळे शाळा, महाविद्यालयांनी याबाबत मार्गदर्शन सत्रं घ्यावीत.

WILP म्हणजे शिक्षण आणि उद्योग यांच्यातील पूल. एकत्रित प्रयत्न केल्यासच हा पूल मजबूत होईल.
विद्यापीठ योग्य दिशा दाखवेल, उद्योग प्रत्यक्ष अनुभव देईल आणि विद्यार्थी स्वतःच्या मेहनतीने या
दोघांचा पुरेपूर उपयोग करून घेतलास, तर आपण एक आत्मनिर्भर आणि कुशल पिढी घडवू शकतो.

  • डॉ.सतीश पवार

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मालेगावसह राज्यातील सर्वच अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाईचे आदेश

Next Post

मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले…राज ठाकरे यांचा संताप

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Raj Thackeray

मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले…राज ठाकरे यांचा संताप

ताज्या बातम्या

Maha Gov logo 07 1 1024x512 1

महाराष्ट्र जीएसटी विभागामार्फत १९२.४५ कोटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर व करचोरी प्रकरणी एकास अटक

जुलै 19, 2025
पशुसंवर्धन विभाग 1001x1024 1

राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती…४५८ कोटीची तरतूद

जुलै 19, 2025
Untitled 42

नाशिक जिल्हा जंपरोप स्पर्धा उत्साहात संपन्न…राज्य फेडरेशन चषक स्पर्धेचेही नाशिकमध्ये आयोजन

जुलै 19, 2025
IMG 20250719 WA0393 1

१५ लाखांचा लुटीचा बनाव उघड; शेअर मार्केट आणि अँटीक नोटांच्या आमिषाला बळी पडून आरोपीने रचला होता बनाव

जुलै 19, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आचारसंहिता पाळावी, अतिरेक टाळावा, जाणून घ्या, रविवार, २० जुलैचे राशिभविष्य

जुलै 19, 2025
crime 88

भरदिवसा झालेल्या दोन घरफोडींमध्ये चोरट्यांनी दहा लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला

जुलै 19, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011